Amravati Crime | पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ

जावयाने सासरवाडी घेऊन सासू व पत्नीवर (Wife) क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू (Women Murder) झालाय. तर आरोपीची पत्नी या हल्ल्यात जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पूर्णा येथे घडली. पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे वय(45) असे मृत महिलेचे नाव असून ही महिला टाकरखेडा पूर्णा येथील रहिवासी आहे.

Amravati Crime | पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 12:44 PM

अमरावती : जावयाने सासरवाडीत जाऊन सासू व पत्नीवर (Wife) कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू (Women Murder) झालाय. तर आरोपीची पत्नी या हल्ल्यात जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पूर्णा येथे घडली. पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे वय(45) असे मृत महिलेचे नाव असून ही महिला टाकरखेडा पूर्णा येथील रहिवासी आहे. तर या घटनेत स्नेहल दिनेश बोरखडे वय 25 वर्षे या आरोपीच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. पत्नी आणि सासूवर जीवघेणा हल्ला करुन आरोपी दिनेश बोरखडे याने घटनास्थळवरुन पळ काढलाय. पोलीस (Police) आरोपीचा शोध असून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सासूवर कुऱ्हाडीने सपासप वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची पत्नी स्नेहल या आई आजारी असल्याने माहेरी गेल्या होत्या. मात्र पत्नी परत घरी न आल्याने आरोपी दिनेश हा सासरवाडीला गेला. येथे त्याने पत्नीशी सुरुवातीला वाद घातला. सासू यावेळी भांडण सोडायला आली असता त्याने आपल्या सासुवर कुर्‍हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात सासूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्ल्यात सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी दिनेशने घटनास्थळावरुन पळ काढला. तो सध्या फरार आहे. या भांडणात आरोपीची पत्नी स्नेहल हीदेखील जखमी झाली आहे.

खून करुन आरोपी फरार, शोध सुरु 

दरम्यान, खुनाची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे पोलिसांनी पंचनामा पूर्ण करुन मृत महिलेचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी आरोपी दिनेशवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी फरार असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केले आहेत. आरोपीचा शोध लगताच त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

इतर बातम्या :

Nagpur Crime | प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

अजब गजब ! मुलीचे अपहरण झाले म्हणून वडिलांची पोलिसात धाव; लेक म्हणते त्रास देऊ नका ‘गॉट मॅरिड’

Pimpri Chinchwad Crime|विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली 18 महिन्यांची शिक्षा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.