ऊन हे सोसवेना ! चालत्या स्कूटीवर बादलीतून पाणी घेऊन त्याने केली अंघोळ, मग ट्राफिक पोलिसांनी लगावला फाईन

त्या तरूणाचा गाडीवर अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू केला.

ऊन हे सोसवेना ! चालत्या स्कूटीवर बादलीतून पाणी घेऊन त्याने केली अंघोळ, मग ट्राफिक पोलिसांनी लगावला फाईन
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 1:55 PM

तंजावर : सध्या अनेक राज्यांत उन्हाचा (summer) पारा खूप चढला आहे. पण गरमीमुळे खूप त्रस्त होऊन काहीजण अजब-गजब कृती करत राहतात. खरंतर तामिळनाडूतील (tamilnadu) तंजावर मधून एक हैराण करणारा व्हिडीओ समोर आला आहे. तेथे वाढत्या उन्हामुळे एक तरूण एवढा वैतागला की तो चालत्या स्कूटीवरच अंघोळ करू लागला.

हा तरूण रस्त्यावरून स्कूटीवरून जात असताना त्याने एका बालदीत पाणी भरले आणि स्कूटीच्या समोरच्या जागेत ठेवले. त्यात त्याने एक जगही ठेवला होता. या व्हिडीओत हे स्पष्टपणे दिसत आहे की तरूण एका हाताने स्कूटी चालवत होता आणि दुसऱ्या हाताने बालदीतील पाणी जगत घेऊन अंघोळ करत होता. हे सर्व तर त्याने केलंच पण डोक्यावर हेल्मेटही लावले नव्हते.

हे सर्व पाहून लोकं हैराण झाले कारण त्यावेळी तो गाडीही चालवत होता. म्हणजेच चालत्या गाडीवर तो अंघोळ करत होता. अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून हसायला आलं खरं पण पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतलं आहे. त्या मुलाला उन्हाचा त्रास होता हे मान्य, पण त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा रितीने कोणीही आपला जीव जोखमीत कसा टाकू शकतं ?

गरमीपासून वाचण्यासाठी जीव जोखमीत टाकला

हा तरूण स्कूटीवर अंघोळीचा आनंद लुटत होता. व्हिडीओ पाहून असं वाटतं होतं की त्याला जीवापेक्षाही उकाड्यापासून बचाव करण्याचीच जास्त काळजी होती. चालत्या गाडीवर अंघोळ केल्याने उन्हाळ्यापासून भलेही त्याचा बचाव झाला असेल पण पोलिसांनी त्याच्यासोबत जे केलं तो ते कधीच विसरू शकणार नाही.

पोलिसांनी ठोठावला दंड

या तरूणाचा स्कूटीवरील अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. त्या तरूणाचे नाव अरूणाचलम तर व्हिडीओ शूट करणाऱ्याचे नाव प्रसन्न असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवणे आणि दुसऱ्या प्रवाशांसाठी जोखीम निर्माण करण्याच्या आरोपाखाली चलान फाडून त्या दोघांनाही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.