Flight Unruly Passenger : एयर हॉस्टेसने शौचालायत जाण्यापासून रोखलं, म्हणून पॅसेंजरने तिथेच जे केलं ते धक्कादायक
Flight Unruly Passenger : पत्नीसोबत असताना प्रवाशाने विमानातच केलं लज्जास्पद कृत्य. पत्नीसोबत दुबईहून सुट्टया एन्जॉय करुन हा प्रवासी मॅनचेस्टरला परतत होता. मॅनचेस्टर विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली.
नवी दिल्ली : तुम्ही विमानाने प्रवास करता, तेव्हा टेकऑफ-लँडिंग आणि टॅक्सी मोडमध्ये कुठल्याही प्रवाशाला टॉयलेटचा वापर करण्याची परवानगी नसते. सुरक्षा कारणांमुळे अशी परवानगी दिली जात नाही. पण एका फ्लाइट पॅसेंजरने हद्दच केली. लँडिंगनंतर एयर हॉस्टेसने एका प्रवाशाला टॉयलेटला जाण्यापासून रोखलं. तेव्हा त्याने आपल्या सीटवरच लुघशंका केली. ही घटना अमीरात एयरलाइन्सच्या दुबईहून मॅनचेस्टरला जाणाऱ्या विमानात घडली.
मॅनचेस्टर इविनिंग न्यूजनुसार, पॅसेंजरची ओळख पटली आहे. लॉयड जॉनसन असं त्याच नाव असून तो 39 वर्षांचा आहे. पत्नीसोबत सुट्ट्या एन्जॉय करुन तो दुबईहून मॅनचेस्टरला परतत होता.
तिथे काय घडलं?
मॅनचेस्टर विमानतळावर उतरताच लॉयडला अटक करण्यात आली. त्याने थेट कोर्टात हजर करण्यात आलं. तपासात त्याने दारु प्याल्याच निष्पन्न झालं. लॉयड चॅपल-एन-ले-फ्रिथ येथे राहतो. लँडिंगच्यावेळी त्याला जोरात लघुशंका लागली होती. त्याचवेळी एयरहॉस्टेसने त्याला शौचालयात जाण्यापासून रोखलं. त्यावर लॉयड इतका रागावला की, त्याने सीटवरच लुघशंका केली. त्यामुळे बाकीचे प्रवासी सुद्धा अडचणीत आले.
नीट उभा सुद्धा राहू शकत नव्हता
मिनशुल स्ट्रीट क्राऊन कोर्टमध्ये सुनावणी झाली. लॉयड नशेमध्ये होता. तो आपल्या पायावर नीट उभा सुद्धा राहू शकत नव्हता. त्याच्या तोंडातून दारुचा उग्र वास येत होता. त्याने अन्य प्रवाशांचा सुद्धा अपमान केला. फ्लाइटमध्ये गोंधळ घातला. तुरुंगवास का नाही झाला?
कोर्टाने लॉयडला विमानात दारुच्या नशेत असल्याप्रकरणी 510 पाऊंड म्हणजे 52,626.05 रुपयांचा दंड ठोठावला. लॉयडने कोणाच नुकसान केलय, हे सिद्ध झालं नाही, त्यामुळे त्याला तुरुंगवास झाला नाही.