Manisha Bidve ची हत्या अनैतिक संबंधातून, ड्रायव्हरची हादरवून टाकणारी कबुली, संतोष देशमुख प्रकरणाशी काय कनेक्शन?
Manisha Bidve Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कनेक्शन जोडलं जात असलेल्या मनिषा बिडवे हत्या प्रकरणात ड्रायव्हरने हादरवून टाकणारी कबुली दिली आहे. हत्या केल्यानंतर ड्रायव्हरने जे केलं, ते वाचल्यानंतर खरच थरकाप उडेल. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा.

कळंब येथील महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने हादरवून टाकणारी कबुली दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी महिलेच नाव जोडलं जातय. मनीषा बिडवे असं मृत महिलेच नाव असून महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबत त्याच खोलीत दोन दिवस झोपला अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली. मृतदेहाशेजारी बसूनच त्याने जेवणही केलं. मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले आपल्या केज येथील मित्राला सोबत घेऊन आला. त्याला मृतदेह दाखवला.
रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मनिषा बिडवे या आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं कळतय. 22 मार्च रोजी हत्या घडली. त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महिला आणि संतोष देशमुख प्रकरणाच्या कनेक्शनवर पोलीस काय म्हणाले?
मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाली आहे. हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. हत्येबाबत आरोपींनी कबुली दिल्याचे ही पोलिसांनी सांगितलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनैतिक संबंध असल्याचं दाखवण्यासाठी महिलेचा वापर केला जात होता का ? यावर तपासाचा भाग असल्याच सांगत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला.
अंजली दमानिया यांनी काय आरोप केला?
हत्या झालेल्या महिलेचा बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वापर करण्यात येणार होता, असा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. ही महिला ५ वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे. मनीषा बिडवे, मनीषा गोंदवले या नावांनी महिलेचा वावर होता, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वाल्मिक कराड हे सर्व करणार होते. त्या बाईंना तयारही ठेवण्यात आले होते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.