AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोठडीतील तपासाची गरज, जामीन नाकारताना कोर्टाच्या गंभीर नोंदी, सचिन वाझेंचा पाय खोलात!

API Sachin Vaze news : कोर्टाच्या आदेशाची प्रत टीव्ही 9 ला मिळाली आहे. यामध्ये कोर्टाने सचिन वाझेंबाबत गंभीर नोंदी केल्या आहेत.  एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze ) यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) फेटाळला आहे.

कोठडीतील तपासाची गरज, जामीन नाकारताना कोर्टाच्या गंभीर नोंदी, सचिन वाझेंचा पाय खोलात!
sachin waze
| Updated on: Mar 13, 2021 | 6:24 PM
Share

ठाणे : एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze ) यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) फेटाळला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. याप्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता याप्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.

कोर्टाने काय म्हटलंय? 

सचिन वाझे यांच्यावर अटकेची तलवार आहे. जामीन फेटाळताना कोर्टाने स्पष्ट म्हटलंय, “त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे” सचिन वाझे यांनी काल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला. ज्याला कोर्टाने नकार दिला होता.

कोर्टाच्या आदेशाची प्रत टीव्ही 9 ला मिळाली आहे. यामध्ये कोर्टाने सचिन वाझेंबाबत गंभीर नोंदी केल्या आहेत. हा गुन्हा हत्येच्या कलमांतर्गत नोंदवला आहे, असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कट कारस्थान दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे.

दुसरीकडे एटीएसनेही कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे. म्हणूनच अर्जदार सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असं कोर्टाने नमूद केलं.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS करत आहेच. शिवाय केंद्रीय तपास यंत्रणा NIA कडूनही तपास होत आहे.

सध्या एटीएसच्या तपासाला गती मिळाल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण एटीएसने मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची काल पुन्हा एकदा तब्बल नऊ तास चौकशी केली. तर त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदरहून ठाण्यात आणणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाचीही काल चौकशी करण्यात आली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास एटीएसचे उपायुक्त राजकुमार शिंदे हेदेखील ठाणे एटीएस कार्यालयात दाखल झाले.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप होत आहेत, ते एपीआय सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एटीएस काही निष्कर्षाप्रत पोहोचली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

NIA कडून सचिन वाझेंचा जबाब

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला जात आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात पहिल्यांदाच सचिन वाझे यांचे स्टेटमेंट नोंदवलं जात आहे. एनआयएकडून मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीन गाडीचा तपास केला जात आहे.

सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय रायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.

सचिन वाझे यांची बदली

सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून साईडलाईन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

सचिन वाझेंची ATS कडून 10 तास चौकशी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या 

आता संयम नाही, जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझे यांचं धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.