AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसुख हिरेन प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता, ठाणे पोलीस दलातील बडा अधिकारी NIAच्या रडारवर!

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAच्या रडारवर ठाण्यातील एक मोठा पोलीस अधिकारी असल्याची माहिती मिळतेय.

मनसुख हिरेन प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता, ठाणे पोलीस दलातील बडा अधिकारी NIAच्या रडारवर!
मनसुख हिरेन प्रकरणात ठाणे पोलीस दलातील मोठा अधिकाऱ्याचा हात असल्याची शक्यता
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ते मनसुख हिरेन हत्या या दोन प्रकरणांमुळे राज्याच्या पोलीस दलात आणि राजकारणात एकच खळबळ माजली. मात्र, आता मनसुख हिरेन प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAच्या रडारवर ठाण्यातील एक मोठा पोलीस अधिकारी असल्याची माहिती मिळतेय. एका माजी पोलीस अधिकाऱ्यानेच मनसुख हिरेनची हत्या केल्याचा संशय NIAला आहे. (Senior Thane police officer Involved in Mansukh Hiren murder case)

मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेनची हत्या झाली त्या दिवशी सचिन वाझेने मनसुख हिरेनला त्या पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन केल्याचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. एनआयएने या हत्या प्रकरणाचे सर्व बिंदू जोडल्याची माहिती मिळतेय. इतकंच नाही तर एनआयए येत्या दोन दिवसांत याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणात बरेच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हजारो कोटींच्या खंडणीच्या खेळात मनसुख हिरेनचा बळी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मयुरेश राऊत यांचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

मनसुख हिरेन प्रकरणात विरारमधील एक बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आपल्या चोरी झालेल्या मर्सिडीज गाडीचा वापर झाल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय. 2017 मध्ये परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना एन्टी एक्सटॉर्शन सेलमार्फत मला पोलीस ठाण्यात बोलावून घेत बळजबरीने डांबून ठेवलं. माझ्या दोन गाड्या मर्सिडीज आणि दुसरी गाडीही घेऊन गेले, असा आरोप राऊत यांनी केलाय.

ठाणे पोलिसांच्या या कृत्याविरोधात आपण न्यायालयात गेलो. न्यायालयाने मला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मी सर्वत्र गेलो पण कुणीही दाद दिली नाही, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केलीय. कोथमिरे यांना निलंबित करावं अशी मागणी करतानाच पोलिसांनी अनेकांची संपत्ती लुटल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माझ्या गाडीचा वापर झाला असावा. NIA आणि राज्यांच्या पोलिसांना माझी विनंती आहे की, त्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

Sachin Vaze Case : एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

परमबीर सिंगांनी आमच्याकडून खंडणी उकळली; क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप

Senior Thane police officer Involved in Mansukh Hiren murder case

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.