AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

17 फेब्रुवारीला सीएसएमटी भागातील सिग्नलवर मनसुख हिरेन सचिन वाझेंच्या काळ्या मर्सिडीज कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. (Mansukh Hiren Sachin Vaze CCTV footage)

VIDEO | मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर
मनसुख हिरेन सचिन वाझे यांची भेट सीसीटीव्हीत कैद
| Updated on: Mar 25, 2021 | 1:17 PM
Share

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) आणि अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या भेटीचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात हिरेन आणि वाझे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. 17 फेब्रुवारीला सीएसएमटी भागातील सिग्नलवर मनसुख हिरेन सचिन वाझेंच्या काळ्या मर्सिडीज कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. जीपीओजवळ गाडी पार्क करुन दोघांमध्ये दहा मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. एनआयएच्या तपासात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील अनेक गोष्टी उलगडताना दिसत आहेत. (Mansukh Hiren Sachin Vaze met at CSMT CCTV footage)

25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनने भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची असल्याचं उघड झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री मनसुख यांना ताब्यात घेऊन ATS अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती. यावेळी त्याने आपली गाडी चोरी झाली होती आणि त्याबाबत आपण गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं होतं.

सचिन वाझेही त्या ठिकाणी होते

मनसुख हिरेन यांना कळवा खाडी भागात आणल्यानंतर क्लोरोफार्मचे रुमाल त्यांच्या नाका-तोंडाजवळ जबरदस्तीने लावण्यात आले. त्यामुळे मनसुख यांनी झटापट केली. या झटापटीत मनसुख यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्यानंतर मनसुख यांना ठार मारुन खाडीच्या पाण्यात टाकण्यात आलं.

यावेळी एकाने क्लोरोफार्म आणलं होतं. हिरेन यांनी प्रतिकार केल्यास त्यांना हाताळण्यासाठी इतर दोन लोक त्या ठिकाणी होती. त्याचप्रमाणे सचिन वाझेही त्या ठिकाणी जवळच उभे असल्याचं एका आरोपीने आपल्या जबाबात सांगितल्याचं एटीएसच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

मुख्य म्हणजे हिरेन यांना खाडी परिसरात आणण्यासाठी व्हॉल्वो गाडीचा वापर केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. क्लोरोफार्मबाबत एटीएस अधिकाऱ्यांनी सविस्तर जबाब नोंदवला आहे. हिरेन यांच्या तोंडात सापडलेले रुमाल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट लवकरच उपलब्ध होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

(Mansukh Hiren Sachin Vaze met at CSMT CCTV footage)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.