Akola Crime : अकोल्यात पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या, सासरच्यांनी हुंडा आणण्यासाठी लावला तगादा, नातेवाईकांचा आरोप

माहेरच्यांनी आज ना उदया तिला सासरचे नांदवतील. परिस्थिती सुधारेल, या आशेने तिला समजावून सांगायचे. परंतु दर्शनाचा त्रास कमी न होता वाढत गेला.

Akola Crime : अकोल्यात पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या, सासरच्यांनी हुंडा आणण्यासाठी लावला तगादा, नातेवाईकांचा आरोप
लग्नाच्या सहा महिन्यातच विवाहित तरुणीची आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील यावलखेड येथील घटनाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 2:03 PM

अकोला : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अकोला जिल्ह्याच्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील यावलखेड (Yavalkhed) इथे घडली आहे. दर्शना प्रशांत पवार (Darshana Pawar) ( वय 24, राहणार बालाजीनगर, कात्रज, पुणे.) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. सध्या सासरकडील सर्व मंडळी फरार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. मंगला अरुण सोळंके यांनी तक्रार दिली. त्यानुसार, दर्शना हिचा विवाह 6 फेब्रुवारी 2022 रोजी प्रशांत रामकृष्ण पवार (Prashant Pawar) (रा. गायगाव, ता. शेगाव, ह.मु. बालाजीनगर, कात्रज) याच्याशी झाला. प्रशांत एका खाजगी कंपनीत पुण्यात कामाला असतो. सासरचेही पुण्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे.

अशी झाली दर्शनाशी वाद घालायला सुरुवात

माहेरकडून दर्शनाला सोने-चांदीचे दागिनेसह 4 लाख 50 हजाराचे भेट वस्तू लग्नात देण्यात आल्या. नंतर दर्शना ही तिच्या पतीबरोबर पुणे इथे राहायला गेली. प्रशांत त्यांचे वडील रामकृष्ण आणि आई नंदा पवार असे चौघेही एकत्र राहत होते. काही दिवस चांगले गेले. नंतर मार्च 2022 मध्ये छोट्या-छोट्या कारणांवरुन पती- सासरच्यांनी दर्शनाशी वाद घालायला सुरुवात केली. तुझ्या आई-वडिलांनी लग्नांमध्ये पाहुण्यांची काही सोय केली नाही. हलक्या दर्जाच्या वस्तू भेट दिल्या. तू खेळपट मुलगी आहे. असे वारंवार टोमणे द्यायचे. अन् मारहाण करायचे, असे नेहमी दर्शना फोनवर सांगायची. असेही तक्रारीत नमूद आहे. यासोबतचं तिला माहेरकडून 1 लाख 50 हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावलाय. त्यानंतर माहेरच्यांनी तिला घेऊन अकोल्याच्या यावलखेडमध्ये घरी आणले. तेव्हा तिने झालेला पूर्ण त्रास माहेरच्यांना सांगितला.

सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे

प्रशांत पवार व सासरच्यांनी नेहमी दर्शनाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला घरून पैसे आणण्यासाठी नेहमी तगादा लावला जात होता. शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकीही दिल्या जायाची. तिने तिच्या माहेरच्या लोकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. मात्र माहेरच्यांनी आज ना उदया तिला सासरचे नांदवतील. परिस्थिती सुधारेल, या आशेने तिला समजावून सांगायचे. परंतु दर्शनाचा त्रास कमी न होता वाढत गेला. सासरचे तिला नेहमी नव-नवीन डिमांड करीत राहिले. दर्शना माहेरी असता तिला फोनव्दारे तुला वागवत नाही. प्रशांत दुसरे लग्न करेल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळचं दर्शनाने आता आत्महत्याचं पाऊल उचललंय. तिने माहेरी यावलखेड इथे 19 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. असा आरोप दर्शनाच्या नातेवाईकांनी केलाय. बोरगाव मंजू पोलिसांनी पंचनामा केला. तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...