लाचार बापाने मुलीचा पाय पिशवीत टाकला, पोलिसात आला! म्हणाला, ‘ओ…मी नाही वाचवू शकलो ओ तिला’

Bihar crime Murder News : लग्नाच्या काही महिन्यांनंतरच ममताच्या सासरकड्यांची एक लाख रुपयांची मागणी केली होती

लाचार बापाने मुलीचा पाय पिशवीत टाकला, पोलिसात आला! म्हणाला, 'ओ...मी नाही वाचवू शकलो ओ तिला'
धक्कादायकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 9:05 AM

लाचार बापाची काळीज पिळवटून टाकणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एक बाप आपल्या मुलीचा शिल्लक राहिलेला पाय पिशवीत टाकून पोलीस स्थानकात पोहोचला आणि ओक्सामोक्शी रडू लागला. पोलिसांसमोर रडत या लाचार बापाने ‘ओ… मी नाही वाचवू शकलो ओ तिला’ असं म्हणत हंबरडा फोडला. या बापाचा आक्रोश पाहून पोलिसांनाही नेमकं काय झालंय, असा प्रश्न पडला होता. बिहारच्या (Bihar Crime News) एका गावात ही घटना घडली. हुंड्यासाठी सासरच्यांनी एका मुलीचा जीव घेतल्याचा (Murder case) आरोप करण्यात आलाय. या मुलीला जाळण्यात आलं, असा आरोप तिच्या बापानं केलाय. हुंड्याची मागणी मी पूर्ण करण्यास नकार दिला, म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी तिला जाळलं (Burn Alive), असा आरोप या मुलीच्या वडिलांनी केलाय. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीच्या पायात असलेल्या पैंजणांवरुन तिच्या बापानं तिची ओळख पटवली. तिचा कापला गेलेला पाय बापानं पिशवीत भरला आणि थेट पोलीस स्थानक गाठलं होतं. त्या व्यतिरीक्त या मुलीच्या शरीराची राख झाली होती.

खळबळजनक घटना

ही घटना बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्याच्या मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी पीडित बापाची व्यथा ऐकून आता याप्रकरणी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. तसंच मुलीच्या सासरकडच्या लोकांवर गुन्हा देखील दाखल केलाय. मुलगी मला इथून घेऊन जाण्यास सांगत होती. सतत त्यासाठी ती माझ्याकडे विनंती करत होती. पण मी तिला वाचवू शकलो नाही, असं म्हणत वडिलांनी रुग्णालयात आक्रोश व्यक्त केला.

अखिलेश बिंद असं या बापाचं नाव आहे. त्यांनी 2021 साली मुलगी ममता हीचं लग्न लावलं होतं. गेल्या वर्षी मे महिन्यात तिचं लग्न झालं. शत्रुघ्न बिंद हिच्याशी ममताचं लग्न लावून देण्यात आलं होतं. ममताच्या मामानेच हे लग्न जुळवलं होतं. मुलगी बिहारच्या भोजपूरमध्ये लग्नानंतर राहत होती. तर वडील अखिलेश बिंद हे आपल्या पत्नीसह गुजरातच्या राजकोटमध्ये वास्तव्यास होता. तर मुलगी गावात मामासोबत राहायची.

हे सुद्धा वाचा

मुलीचा उरलेला पाय घेऊन बाप पोलिसाकडे..

लग्नाच्या काही महिन्यांनंतरच ममताच्या सासरकड्यांची एक लाख रुपयांची मागणी केली होती. पण पैसे देण्यास नकार दिल्यानंतर सासरकडच्या लोकांनी ममताला मारहाण करणं, तिला छळणं, असे प्रकार सुरु केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सोमवारी तिच्या सासरकडच्या लोकांनी तिला जाळलं. याबाबत जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा अखिलेश ममतच्या सासरी पोहोचले. तेव्हा त्यांना फक्त आपल्या मुलीचा उरलेला पाय मिळाला होता. तिच्या अख्ख्या शरीराची राख झाली होती. पायात असलेल्या एका पैजणांच्या मदतीनं त्यांनी आपल्या मुलीचा पाय ओळखला होता. हाच पाय एका पिशवीत भरुन ते पोलीस स्थानकात पोहोचले आणि त्यांनी मुलीच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केलेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवली असून अधिक तपास सुरुय.

ममताने काय म्हटलं होतं?

ममताने आपल्या मामीला आपल्या होणाऱ्या छळाबाबत सांगितलं होतं. पती आणि सासरे रोज पैशांची मागणी करतात आणि मला मारहणार करतात, असं तिनं म्हटलं होतं. आम्ही पैसे नाही दिले, म्हणून तिला जाळून मारुन टाकलं, असा आरोप ममताच्या मामांनी केलाय.

पायाची डीएनए टेस्ट..

अजूनतरी या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आता ममताचा पाय असल्याचा दावा करण्यात आलेल्या त्या भागाची डीएनए चाचणी केली जाणार आहे. तपास केला जातोय. पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासाची काही खळबळजनक खुलासे करण्यात आलेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममताची हत्या आधी करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह एका ठिकाणी पुरण्यात आलेला. तिथून तो पुन्हा उकरुन काढत जाळण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.