26/11 Attack : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास; पाकिस्तान कोर्टाचा निकाल

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याचे कट-कारस्थान हाफीजने पाकिस्तानात राहून रचले होते. त्या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह तब्बल 166 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. हाफीजला संयुक्त राष्ट्रला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज बटर यांनी त्याला शुक्रवारी दहशतवादाच्या अन्य दोन गुन्ह्यांत एकूण 31 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

26/11 Attack : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास; पाकिस्तान कोर्टाचा निकाल
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 7:15 PM

इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद (Hafeez Saeed) याला दहशतवादाच्या आणखी दोन गुन्ह्यांत 31 वर्षांच्या तुरुंगवासा (Imprisonment)ची शिक्षा झाली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय संकट अधिक गडद होत चालले आहे. याचदरम्यान हाफिज सईदविरोधात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली आहे. पण पुढे सार्वत्रिक निवडणुका होतील की विरोधी पक्षांच्या महाआघाडीतून शाहबाज शरीफ पंतप्रधान होतील, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Mastermind of Mumbai attacks Hafeez Saeed sentenced by Pakistani court to 31 years in prison)

26/11 च्या हल्ल्याचा कट हाफिजने रचला होता

हाफिज मुहम्मद सईद हा पाकिस्तानमधील कट्टर इस्लामी दहशतवादी आहे. तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा सह-संस्थापक आहे आणि जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. ही मुख्यत: पाकिस्तानातून कार्यरत असलेली दहशतवादी संघटना आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याचे कट-कारस्थान हाफीजने पाकिस्तानात राहून रचले होते. त्या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह तब्बल 166 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. हाफीजला संयुक्त राष्ट्रला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज बटर यांनी त्याला शुक्रवारी दहशतवादाच्या अन्य दोन गुन्ह्यांत एकूण 31 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर हाफीज सईदने उभारलेली मदरशा आणि मशिदीसह त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या निकालाने हाफिजला मोठा झटका बसला आहे, असे एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हाफिजला दोन प्रकरणांमध्ये एकूण 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदला दोन प्रकरणांमध्ये एकूण 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हाफिज सईदने बांधलेली मशीद आणि मदरसादेखील ताब्यात घेतले जाणार आहे. न्यायालयाने तसा आदेश दिला आहे. हाफिज सईदवर एकूण 3,40,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज लोणी यांनी सुनावणी पूर्ण करीत हा निकाल दिला. सीटीडीने हाफिज सईदसह इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीही हाफिज सईदला दहशतवादविरोधी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. (Mastermind of Mumbai attacks Hafeez Saeed sentenced by Pakistani court to 31 years in prison)

इतर बातम्या

Madhya Pradesh: पत्रकारासह आठ जणांची पोलीस ठाण्यात अर्ध नग्न परेड, मध्यप्रदेश पोलिसांवर छळवणुकीचा आरोप; काय आहे प्रकरण?

UP : महिलांवरती बलात्कार करण्याची उघडपणे धमकी, व्हिडीओच्या आधारे महंतांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.