बॉयफ्रेंड कापलेले हात-पाय घेऊन झोपला तर पत्नी धड… सौरभ प्रकरणात क्रूरतेची हद्दच पार
मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शवविच्छेदन अहवालात मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी सौरभची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रथम त्यांनी सौरभच्या शरीराचे तुकडे केले आणि नंतर दारूच्या नशेत ते रात्रभर हे तुकडे घेऊन झोपले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये लपवून ठेवले.

मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी सौरभ राजपूतची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोघांनी आधी हृदयावर चाकूने तीन वार केले. यामुळे सौरभच्या हृदयाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर त्याचे धड शरीरापासून वेगळे करुन हात पाय कापले. सौरभचे चार तुकडे केल्यानंतर मुस्कान स्वतः सौरभचे धड बेडवर ठेवून त्याच्यासोबत झोपल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.
साहिल शुक्ला हा सौरभचे हातपाय तोडून दुसऱ्या खोलीत झोपला होता. दुसऱ्या दिवशी दोघांनीही चारही तुकडे ड्रममध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण ते ड्रममध्ये मावत नसल्यामुळे त्यांनी सौरभच्या शरीराचे आणखी अनेक तुकडे केले. मर्चंट नेव्हीमधील माजी अधिकारी सौरभ राजपूतच्या मृतदेहाचा पोलिसांनी पोस्टमार्टम केला. सौरभ राजपूतच्या छातीवर लांब ब्लेड असलेल्या चाकूने तीन वार केल्याचे समोर आले आहे. हे हल्ले मुस्काननेच केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर साहिलने सौरभची मान कापली आणि त्यानंतर त्याचे हात पाय कापले.
वाचा: 800 रुपयात मटण कापण्याचे दोन चाकू, 300 रुपयात वस्तरा… डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची भानगड काय?
मृतदेहाजवळ बसून प्यायले दारू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा केल्यानंतर दोघेही त्याच मृतदेहाजवळ बसून दारू पिवू लागले. यानंतर सौरभचे धड बेडवर ठेवून मुस्कान झोपली. साहिलने कापलेले हात-पाय दुसऱ्या खोलीत नेले आणि तिथेच तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दोघांनीही मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश न आल्याने त्यांनी त्यांचे आणखी तुकडे केले. यानंतर सर्व तुकडे एका ड्रममध्ये टाकून सिमेंटने बंद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सौरभ राजपूतच्या मृत्यूचे कारण शॉक आणि रक्तस्त्राव असल्याचे सांगण्यात आले आहे.
ड्रममध्ये टाकला मृतदेह
पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आणि साहिल यांनी मृतदेहाचे तुकडे एका ड्रममध्ये ठेवले. त्यावर थोडी माती आणि सिमेंट टाकून त्यात पाणी भरले. सिमेंट टाकल्यामुळे मृतदेह गोठला होता.आतमध्ये हवा येऊ शकली नाही त्यामुळे मृतदेहाचे विघटन होऊ शकले नाही. तसेच घरात मृतदेह असूनही दुर्गंधी येत नव्हती. शवविच्छेदन गृहात कटरने ड्रम कापून मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मर्चंट नेव्हीमधील नोकरी सोडल्यानंतर सौरभ लंडनमधील एका बेकरीमध्ये काम करत होता. 2 वर्षानंतर, तो 24 फेब्रुवारीला त्याची पत्नी मुस्कानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात परतला. परंतु पुढच्याच आठवड्यात मुस्कानने तिच्या प्रियकरासह त्याची हत्या केली.