ज्यांनी कुणी मर्डरची बातमी वाचली तो सुन्न झाला, पोस्टमार्टम स्टाफ थरथरत म्हणाला, उभ्या आयुष्यात…
मेरठमध्ये सौरभची हत्या करण्यात आली. त्याची बायको आणि तिच्या प्रियकराने मिळून ही हत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पण जेव्हा सौरभचा मृतदेह ड्रममध्ये कापून ठेवला आणि ड्रम सीमेंटने बंद केल्याचं उघड झालं तेव्हा संपूर्ण देश हादरून गेला. इतकी भयानक हत्या यापूर्वी कधीच कुणाची झाली नव्हती, अशीच प्रतिक्रिया प्रत्येकजण देत आहे.

मेरठमध्ये एक अत्यंत भयानक हत्याकांड झालंय. या हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू आहे. सौरभ हत्याकांडाने केवळ पोलीसच नव्हे तर पोस्टमार्टम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी वर्गही हादरून गेला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रम, चाकू, सिमेंट आणि वाळूचा वापर क रण्यात आला. ज्यांनी कोणी या मर्डरची बातमी वाचली तो सुन्न झालाय. आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही अशी केस पाहिली नव्हती, असं या पोस्टमार्टम स्टाफचं म्हणणं आहे.
मृतदेह ठेवलेला ड्रम कापणाऱ्या बलवीरने मीडियाशी संवाद साधला होता. सौरवची हत्या करून त्याच ड्रममध्ये त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. मृतदेह ड्रममध्ये कोंबून त्याला सीमेंटने पॅक केलं होतं. त्यामुळेच बलवीरला ड्रम कापायला बोलावलं होतं. बलवीर म्हणाला, मी माझ्या आयुष्यात अनेक मृतदेह पाहिले. पण अशा अवस्थेतील मृतदेह पहिल्यांदाच पाहत आहे. मला प्लास्टिकचा हा ड्रम कापण्यासाठी अर्धा तास लागला. त्यानंतर कटर आणि हातोड्याच्या मदतीने घट्ट झालेलं सीमेंट तोडलं. त्यातच सर्वात खाली प्लास्टिकमध्ये पॅक केलेलं डोकं ठेवलं होतं. मुंडकं कपड्याने झाकलेलं होतं. दोन्ही मनगटेही धडापासून वेगळी करण्यात आली होती, असं बलवीर म्हणाला.
वाचा: बुजुर्ग व्यक्तीला घरी बोलावलं, गुंगीचं ड्रिंक देऊन अश्लील व्हिडीओ बनवला आणि मग… पुढे काय घडलं?
ड्रम कापता कापता घाम फुटला
ड्रमच्या वरच्या भागात 6 इंच एवढा सीमेंटचा लगदा होता. हा लगदा तोडण्यासाठी 5 मजूर लागले. तसेच अडीच तास मेहनत करावी लागली. हातोडा, कटर आणि ग्राइंडरचा वापर करण्यात आला. सीमेंट मृतदेहाला चिपकलं होतं. ते काढण्यासाठी अनेक तास लागले. जेव्हा ड्रम उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून आम्ही सर्वच हादरून गेलो होतो, असं बलवीरने सांगितलं.
डॉक्टरही चक्रावले
मेरठचे सीएमओ डॉ. अशोक कटारिया यांनी पोस्टमार्टेमचा हवाला देत महत्त्वाची माहिती दिली. सौभरची हत्या दोन आठवड्यापूर्वी झाली आहे. हल्लेखोरांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा मृतदेह ड्रममध्ये लपवला. वरून सीमेंट लावलं. शरीराचं विघटन होऊ नये म्हणू नत्यांनी असं केलं. मृतदेहाचे असंख्य तुकडे करण्यात आले होते. दात हलले होते आणि स्कीनही ढिली झाली होती. माझ्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये मी इतका भयानक प्रकार कधीच पाहिला नाही, असं डॉ. कटारिया म्हणाले.
चाकू मारून हत्या
मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने 4 मार्च रोजी सौरभची चाकू हल्ला करून हत्या केली होती. पण हत्येनंतर त्यांनी जे केलं ते एखाद्या सिनेमातील सीनपेक्षाही खतरनाक होतं. आधी सौरभच्या छातीवर वार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन त्याच्या शरीराचे तुकडे केले. डोकं वेगळं केलं. धड वेगळं केलं. बोटंही वेगळी केली. त्यानंतर शरीराचे हे सर्व तुकडे ड्रममध्ये टाकले आणि वर सीमेंट रेती टाकून हा ड्रम सील करण्यात आला. दुर्गंधी सुटू नये म्हणून त्यांनी हे अत्यंत घाणेरडं कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं.