पॉकेटमनी दिला नाही म्हणून राग, मुलानेच दिली जन्मदात्या वडिलांच्या हत्येची सुपारी

आपल्या छान-छौकीसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुलगा अनेकदा घरातून दागिने चोरायचा, दुकानातून पैसे चोरायचा. त्याने मारेकऱ्यांना सहा लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. त्यापैकी दीड लाख रुपये आधीच दिले होते.

पॉकेटमनी दिला नाही म्हणून राग, मुलानेच दिली जन्मदात्या वडिलांच्या हत्येची सुपारी
मुलानेच दिली पित्याच्या हत्येची सुपारी
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 3:20 PM

आपली मुलं सुखात रहावीत म्हणून आई-वडील काहीही करू शकतात, त्यांच्यासाठी ते अपार कष्ट करतात. पण काही मुलांना याची जाणीव नसते, आणि ते आपल्याच जन्मदात्यांना त्रास देतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका मुलाने त्याच्याच वडिलांना मारण्याची सुपारी दिल्याचे उघड झाले. मारेकऱ्यांना त्याने पैसे देऊन वडिलांची हत्या करण्यास सांगितले.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, शहरातील व्यावसायिक मोहम्मद नसीम (वय 50) यांची बाईकवरून आलेल्या तिघांनी गोळी मारून हत्या केली. पोलिसांनी त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पीयूष पाल, शुभम सोनी आणि प्रियांशु अशी त्यांची नावे आहेत. मात्र चौकशीदरम्यान त्यांची कबुली ऐकून पोलिसही अवाक् झाले. मोहम्मद नसीम यांच्या मुलानेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी कबुली मारेकऱ्यांनी दिली.

त्याआधारे पोलिसांनी मृत व्यावसायिकाच्या 16 वर्षांच्या मुलास ताब्यात घेतले असता, त्याने वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचं कबूल केलं. त्याने मारेकऱ्यांना सहा लाख रुपये देण्याचे वचन दिलं होतं, त्यापैकी दाड लाख रुपये त्याने आधीच दिले. मृत व्यावसायिक हे त्यांच्या मुलाला पॉकेटमनी म्हणून भरपूर पैसे देत नव्हते, यामुळे तो नाराज होता, अस पोलिसांनी सांगितलं.

अल्पवयीन मुलाच्या कबुलीनुसार,आपल्या छान-छौकीसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अनेकदा घरातून दागिने चोरायचा किंवा दुकानातून पैसे चोरायचा. त्याने आधीही त्याच्या वडिलांच्या हत्येची योजना आखली होती, पण तेव्हा त्याला यश मिळालं नव्हतं. अखेर त्याने मारेकऱ्यांना सुपारी देऊन वडिलांची हत्या घडवली. पोलिसांनी आरोपी मारेकऱ्यांची रवानगी तुरूंगात केली आहे तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात धाडण्यात आलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.