Thane | खेळायला गेला अन् अक्रित घडलं, एकुलत्या एक मुलाचा खड्ड्यात आढळला मृतदेह, ठाण्यात नेमकं काय घडलं ?

डोंबिवली पूर्व भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Thane | खेळायला गेला अन् अक्रित घडलं, एकुलत्या एक मुलाचा खड्ड्यात आढळला मृतदेह, ठाण्यात नेमकं काय घडलं ?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 8:21 AM

ठाणे : डोंबिवली (Dombivali) पूर्व भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तो आपल्या आई-वडिलांचा (Father And Mother) एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी (Police) पुढील तपास सुरू केला आहे. मुलगा खड्ड्यात कसा पडला ? मुलासोबत घडलेली घटना म्हणजे घातपात आहे का ? अशा सर्व अनुषंगाने पोलीस तपास करत आहे. 10 वर्षीय मुलाच्या जाण्याने येथील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

मुलगा खेळण्यासाठी गेला, अन् अक्रित घडलं

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे मृत मुलाचे वडील भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांचा 10 वर्षाचा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. जवळपास दोन तास मुलगा घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊनही तो न सापल्यामुळे पालकांची चिंता वाढली.

मुलाचा मृतदेह खड्ड्यात आढळल्याने खळबळ 

नंतर मृत मुलाच्या आई-वडिलांनी आसपासच्या इमारतींमध्ये जाऊन मुलाचा शोध घेतला. मात्र एका इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते; या पाण्यात मुलाचा मृतदेह आढळून आला. आपल्या मुलाचा मृतदेह आढळताच त्याच्या आईवडिलांना रडू कोसळले. त्यांच्यावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी 

दरम्यान, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निष्काळजीपणा करणाऱ्या विरुद्ध ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तसेच लिफ्टचे काम सुरु होते तर योग्य ती खबरदारी का घेतली गेली नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

इतर बातम्या : Mumbai Crime : लग्नासाठी लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या आशिकला मिर्झापूरमधून अटक

विजया बाविस्कर हत्या प्रकरण; मैत्रीणीनेच केला विश्वासघात, ‘असा’ झाला हत्येचा उलगडा

मृत्यूनंतर गणेशचा दफनविधी केला! 3 दिवसांनंतर पोलिस आले, दफन केलेलं प्रेत बाहेर काढून….

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.