Kalyan Crime : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात हल्ला, मुलीच्या हत्येनंतर आरोपीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

प्रेमप्रकरणातून मुलींवरील हल्ल्याच्या घटना हल्ली वाढतच आहेत. आरोपी खुलेआम मुलींवर हल्ले करताना दिसत आहेत. अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.

Kalyan Crime : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात हल्ला, मुलीच्या हत्येनंतर आरोपीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न
कल्याणमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 10:28 PM

कल्याण / 16 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये महिला-मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. नुकतीच एक घटना कल्याण पूर्वेतील कोळसे वाडी परिसरात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात चाकूने वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदित्य कांबळे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित मुलगी केवळ 12 वर्षाची असून, आरोपी दररोज तिचा पाठलाग करत छेडछाड करायचा. मुलीने याबाबत घरी सांगितल्यानंतर तिची आई सतत तिच्या सोबत असायची. नेहमीप्रमाणे आज सायंकाळी 7.30 च्या सुमारास आईसोबत घरी चालली होती. यावेळी आरोपी सोसायटीच्या आवारातच तिची वाट पाहत बसला होता. मुलगी सोसायटीच्या आवारत येताच त्याने चाकू काढला आणि सपासप वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, मुलीवर हल्ला करुन पळ काढत असतानाच आरोपीला सोसायटीमधील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी गोंधळाचा फायदा घेत आरोपीने बरोबर आणलेले फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी त्याला उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतर शहरात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.