आधी वस्तू, कपडे तपासले, अचानक एक नंबर सापडला अन्… वडिलांनी मुलीच्या आत्महत्येचा असा लावला छडा; धक्कादायक माहिती काय?

जून महिन्यात पिंपरी चिंचवडमधील अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं होतं. तेव्हापासून तिचे वडील प्रचंड अस्वस्थ होते. मुलीने असं टोकाचं पाऊल का उचललं ? याचा शोध लावण्याचा चंगच त्यांनी बांधला.

आधी वस्तू, कपडे तपासले, अचानक एक नंबर सापडला अन्... वडिलांनी मुलीच्या आत्महत्येचा असा लावला छडा; धक्कादायक माहिती काय?
क्राईम न्यूज
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 1:50 PM

विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्मार्ट सिटी पिंपरी- चिंचडवडमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाच महिन्यांपूर्वी,6 जून रोजी पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं होतं. तिने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आणि प्रचंड खळबळ माजली. मात्र आपल्या मुलीच्या अक्समात मृत्यू तिच्या कुटुंबियांलब तिचे वडीलही प्रचंड हादरले. आपल्या मुलीने एवढं टोकाचं पाऊलं का उचललं ? हा प्रश्न त्यांचं मन पोखरत होता. अखेर पोलिसांनी त्यांनीच आपल्या मुलीच्या मृ्त्यूचे गूढ उकलतं तिच्या मृत्यूसाठी कारणमीभूत ठरलेल्या खऱ्या आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरूणांना अटक केली आहे. क्षितिज पराड आणि तेजस पठारे असे आरोपींचे नाव असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

असा लावला आरोपींचा शोध

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीने 6 जून 2024 या दिवशी संध्याकळी घरात गळफास लावून आत्महत्या केली. एवढ्या लहान मुलीने आयुष्य संपवल्याने एकच खळबळ माजली. प्रचंड धक्का बसलेले तिचे कुटुंबिय शोकाकुल अवस्थेत होते. पण त्या मुलीचे वडील खूप अस्वस्थ होते. आपल्या मुलीने आत्महत्या का केली ? घरात तिला कोणी काही बोललं नाही, ओरडलं नाही मग तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं ? या प्रश्नांचा भुंगा त्यांचंम मन आणि डोक पोखरत होता. नेमकं काय घडलं? याचा शोध लावायचा चंग वडिलांनी बांधला आणि शोध सुरू केला.

त्यांनी त्यांच्या मृत मुलीच्या वस्तू तसेच कपडे शोधायला, त्यातून काही सुगावा मिळतोय का हे तपासायला सुरूवात केली. त्याचदरम्यान त्यांना त्या मुलीच्या एका ड्रेसच्या खिशात एक चिठ्ठी साप़डली, त्यावर एक मोबाईल नंबर लिहीलेला होता. पण घरातल्यांपैकी, ओळखीच्यांपैकी तो नंबर कोणाचाच नव्हता. तिथेच वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी प्रयत्न करून आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता दोन मुलं वारंवार त्यांच्या मुलीच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे दिसलं. यामुळे आरोपी हे मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होते. तिचा लैंगिक छळ करत होते, असा आरोप करत त्या मुलीच्या कुटुंबियांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली,असा आरोपही त्यांनी लावला.

त्यानुसार, भोसरी पोलिसांनी देखील तात्काळ पॉक्सोचा गुन्हा दाखल करून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोघांना अटक केली. मात्र मुलीच्या आत्महत्येनंतरच पोलिसांनी काही तपास का केला नाही, दु:खात असलेल्या वडिलांनाच का तपास करावा लागला, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.