मुलाला शॉक लागला म्हणून आई वाचवायला गेली, मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते
दोघांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मायलेकाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जालौन : सध्या देशभर दिवाळी सणाचा (Deewali Festival) उत्साह आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना उत्तर प्रदेशात एक अशी घटना घडली (Incident happened in uttar pradesh) आहे, ज्यामुळे सर्वांचे मन हेलावून टाकले आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस असल्याने घरात सर्व जण उत्साहात होते. इतक्यात घरातील दोन वर्षाच्या मुलाला वीजेचा शॉक लागला. मुलाला वाचवायला आई धावत गेली. मात्र दुर्दैवाने दोघांचाही शॉक लागून मृत्यू (Death by Electric Shock) झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
घरात खेळत होता चिमुकला
उत्तर प्रदेशातील जालौनमधील काल्पी कोतवाली परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आज दिवाळीच्या पहिला दिवस आहे. घरात सर्वजण उत्सवाच्या आनंदात होते. यावेळी दोन वर्षाचा चिमुकलाही घरात खेळत होता.
टेबलफॅनचा शॉक लागून मृत्यू
अचानक टेबलफॅनमध्ये करंट उतरला. तेथे खेळत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला हा करंट लागला. मुलाला करंट लागलेले पाहताच आई त्याला वाचवण्यासाठी धावत आली. मात्र मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना आईचाही वीजेचा धक्का लागला.
मायलेकाचा करुण अंत
दोघांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मायलेकाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन सणासुदीत मायलेकाचा करुण अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.