Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani Child Death : जुना वाद उफाळून आला, मग सासू-सुनेने चिमुकल्यासोबत जे केले ते पाहून संपूर्ण जिल्हा हादरला !

मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने धोत्रे कुटुंबीयांनी ताडकळस पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.

Parbhani Child Death : जुना वाद उफाळून आला, मग सासू-सुनेने चिमुकल्यासोबत जे केले ते पाहून संपूर्ण जिल्हा हादरला !
पूर्ववैमनस्यातून परभणीत सासू-सुनेने मुलाला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 2:00 PM

परभणी : पूर्ववैमनस्यातून सासू-सुनेने मिळून शेजारी राहणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना परभणीत उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह आपल्या घरातच पुरला होता. घटना उघडकीस येताच ताडकळस पोलिसांनी सासू सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. कावेरी बनगर आणि अन्नपूर्णा बनगर अशी अटक करण्यात आलेल्या सासू सुनेची नावे आहेत. तर सासरा बाळासाहेब बनगर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सहा वर्षापूर्वी कुटुंबातील व्यक्तीच्या अपघाती मृत्यू सल मनात ठेवून कृत्य

सहा वर्षापूर्वी आरोपी कावेरी बनगरचा नवरा आणि अन्नपूर्णा बनगर हिचा मुलगा गजानन बनगर हा धोत्रे यांच्या विहिरीचे बांधकाम करत होता. यावेळी काम चालू असताना दगड अंगावर पडून त्याचा अपघाती मृत्यू झाला होता.

मात्र या अपघाताला शेजारी राहणारे धोत्रे कुटुंबीय जबाबदार असल्याचे बनगर कुटुंबाचे म्हणणे होते. यावरुन त्यावेळी त्यांच्यात वादही झाला. मात्र ग्रमास्थांच्या मध्यस्थीनंतर तडजोड करत हे प्रकरण तेव्हा शांत झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

हे सुद्धा वाचा

मात्र बनगर सासू सुनेच्या मनात मात्र त्या घटनेचे शल्य कायम राहिले. म्हणून त्यांनी धोत्रे कुटुंबीयांना धडा शिकवण्याचे ठरवले. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताचे बदला त्यांनी धोत्रे यांच्या तीन वर्षाच्या मुलाला संपवून घेण्याचे ठरवले.

तीन दिवसांपूर्वी अपहरण करत हत्या

तीन दिवसांपूर्वी धोत्रे यांचा तीन वर्षाचा मुलगा शेतात खेळत असताना या सासू सुनेने त्याचे अपहरण केले. मग त्याला आपल्या घरी आणत त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आपल्याच घरातील फरशीखाली चिमुकल्याचा मृतदेह पुरला.

मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानंतर धोत्रे कुटुंबीय त्याचा सर्वत्र शोध घेत होते. मात्र तो कुठेही सापडला नाही. यानंतर धोत्रे कुटुंबीयांनी ताडकळस पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.

पोलिसांनी अपहरणच्या दृष्टीने तपास केला असता घटना उघड

यानंतर पोलिसांनी अपहरण झाले असावे असे गृहित धरुन मुलाचा शोध सुरु केला. यावेळी धोत्रे कुटुंबाचे कुणाशी वाद वगैरे होते का याचीही चौकशी केली. यादरम्यान ताडकळस पोलिसांनी संशयाच्या आधारे कावेरी बनगर हिला ताब्यात घेतले.

पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत कावेरीची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. कावेरी आणि तिच्या सासूने 16 जानेवारी रोजी मुलाची हत्या करुन मृतदेह घरात पुरल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

ताडकळस पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बनगर यांच्या घरातून चिमुकल्याचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेतून ताब्यात घेतला. पोलिसांनी सासू सुनेला अटक केली आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.