AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्…

असे म्हटले जाते की सासू आणि जावई यांच्यातील नाते आई आणि मुलासारखेच असते. पण नुकताच एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्...
Crime News Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 12, 2025 | 1:53 PM
Share

सध्या सासू आणि जावयाच्या अफेअरच्या बातम्या सतत समोर आहेत. अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. एका आईने तिच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच पळून जाण्याचा प्लान केला होता. एवढेच नाही तर या प्रकरणात एकामागून एक नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. जावयासह पळून जाण्याची संपूर्ण योजना सासूनेच आखल्याचे समोर आले. ती तिच्या जावयाशी दररोज १५ तासांपेक्षा जास्त वेळ बोलत असे. या प्रकरणात, सासरे जितेंद्र कुमार यांनी आता त्यांच्या होणार्‍या जावयाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याच वेळी, जितेंद्रने पळून जाण्यापूर्वी पत्नीने केलेल्या आश्चर्यकारक योजनेबद्दल सांगितले.

नेमकं काय झालं आहे?

हे प्रकरण अलीगढच्या मद्रक पोलिस ठाण्याचे आहे. येथील एका गावात राहणारा जितेंद्र कुमार बंगळुरूमध्ये काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याची मुलगी शिवानीचे लग्न राहुलशी ठरवले होते. मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी ५ लाख रुपयांचे दागिने तयार केले होते आणि ३ लाख ५० हजार रुपयांची व्यवस्थाही केली होती. पण होणारा जावई त्याच्या सासूच्या प्रेमात पडला होता. अशा परिस्थितीत दोघांनीही एक योजना आखली आणि पळून गेले. पळून जाण्यापूर्वी, महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिने आणि तिने वाचवलेले पैसेही चोरले. कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वाचा: प्रसुतीनंतर लगेच जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले; पत्नीचे विवाहबाह्य संबंध जाहीर करणाऱ्या पतीवरच उलट आरोप

पतीने माध्यमांना सांगितले त्याचे दुःख

जितेंद्र कुमार यांनी माध्यमांशी बोलताना आपले दुःख व्यक्त केले. तो म्हणाला, माझ्या पत्नीने मला कार्ड मेहुणीला देण्यास सांगितले. मुलीचे लग्न १६ एप्रिल रोजी ठरले होते. अशा परिस्थितीत कार्ड तिथे पोहोचवणे आवश्यक होते. मी माझ्या मेहुणीला कार्ड देण्यासाठी गेलो होतो. माझ्या मेहुणीला कार्ड देऊन मी घरी आलो तेव्हा मला माझी बायको कुठेच दिसत नव्हती. काही काळासाठी असं वाटत होतं की ती एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेली आहे. पण नातेवाईकांच्या ठिकाणी चौकशी करूनही तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही तेव्हा संशय अधिकच वाढला.

त्यानंतर जितेंद्रने कॉल डिटेल्स चेक केले. त्यावेळी मला कळाले की जावयाशी तासनतास बोलत आहे. या प्रकरणात, जेव्हा मी जावयला बोलावले तेव्हा तो मला म्हणाला की गेल्या २० वर्षांपासून तुम्ही एकत्र राहात आहात, तुम्ही तुमच्या पत्नीला खूप त्रास देत आहात. आता तुम्ही हे सगळं विसरुन जा. आता ती माझी आहे.

पोलिस दोघांचाही शोध घेत आहेत

नवरा म्हणाला, ‘मी गावात राहत नाही, मी बंगळुरूमध्ये राहतो आणि काम करतो.’ घरी आल्यावर मला कळले की माझी बायको तिच्या होणार्‍या जावयाशी खूप जास्त बोलते. मलाही त्यांच्या नात्याबद्दल शंका होती. कारण भावी जावई मुलीपेक्षा पत्नीशी जास्त बोलायचा. घरातून पळून जाताना तिने तिच्या घरातील ५० हजार रुपयांची रोकडही नेली. ३.५ लाख रुपये आणि सुमारे ५ लाख रुपयांचे दागिनेही चोरले. दरम्यान, पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यात फसवणूक, विश्वासघात आणि मालमत्तेची चोरी यासारखे गंभीर पैलू आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.