Bihar: तीन मुलांच्या आईवर प्रेम, सतत फोन, रात्री भेटायच्या निमित्ताने गेला पण…
तीन मुलांच्या आईशी फोनवर संपर्क, रात्री भेटायला आणि थेट...
पाटणा : मोबाईलमुळे (Mobile) सगळं जग जवळ आल्याचं आपण जरी म्हणतं असलो, तरी त्याचे दुष्परिणाम (side effects) सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत . कारण जरी जग जवळ आलं असलं तरी, लोकं चुकीच्या पद्धतीने त्याचा फायदा घेत असल्याचे वारंवार उजेडात आले आहे. एका तरुणांने (Young) तीन मुलाच्या आईचा नंबर कुठून तरी मिळविला. एकतर्फी तिच्या प्रेमात पडला. तिला सतत कॉल करीत होता असं पीडीत महिलेने सांगितलं आहे.
मुळात ही घटना बिहारची आहे, बिहारमध्ये आतापर्य़ंत एकतर्फी प्रेमातून अनेक घटना घडल्या आहेत. तीन मुलांच्या आईला भेटायला गेलेल्या तरुणाला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थ आता आम्हाला वाटलं चोर आहे, अशी कारणं सांगत आहेत. त्याचबरोबर पीडित महिलेने वारंवार फोन करुन त्रास देत असल्याचे सांगितले आहे.
ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. एका युवकाचा ग्रामस्थांच्या मारहाणीत मृ्त्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत आणखी एकजण होता, अशी माहिती एक वेबसाईटने दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरुन अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच संबंधित घटनेची अधिक चौकशी करणार माहिती पोलिसांनी सांगितली आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेची सुद्धा सखोल चौकशी होणार आहे.