‘धोनी’ सिनेमातील अभिनेत्याची आत्महत्या, सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक

फेसबुकवर आपली व्यथा व्हिडीओच्या माध्यमातून मांडत संदीप नाहरने जीवन संपवलं. (Actor Sandeep Nahar Suicide )

'धोनी' सिनेमातील अभिनेत्याची आत्महत्या, सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक
अभिनेता संदीप नाहर (डावीकडे) आणि सुशांतसिंह राजपूत
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 8:37 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत ‘एम एस धोनी’ चित्रपटात झळकलेल्या आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केली. अभिनेता संदीप नाहर (Sandeep Nahar) याने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी संदीपने पत्नी आणि सासूच्या स्वभावदोषाकडे बोट दाखवलं होतं. त्यानंतर सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. #SSRiansFightBack हा हॅशटॅग ट्रेण्ड करत सुशांतसोबत संदीपलाही न्याय देण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे. (MS Dhoni Actor Sandeep Nahar Suicide Sushant Singh Rajput fans trend SSRiansFightBack)

अभिनेता संदीप नाहरने एमएस धोनी, केसरी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. काल संध्याकाळी फेसबुकवर आपली व्यथा पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून मांडत संदीपने जीवन संपवलं. संदीपचे मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांनी त्याला फोन करुन अडवण्याचाही व्यर्थ प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याने जगाचा निरोप घेतला होता. ही पोस्ट नंतर फेसबुकवर हटवण्यात आली आहे. संदीपने पत्नीला आत्महत्येस जबाबदार ठरवू नये, असं स्पष्ट म्हटलं आहे. परंतु पुरुषांची दुःखही समजून घ्या, अशी मागणी सुशांतचे चाहते हिरीरीने करत आहेत.

संदीप नाहरची फेसबुक पोस्ट

“आयुष्यात अनेक सुख-दु:खं पाहिली. प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी ज्या अवस्थेतून जात आहे ते सहन करण्यापलिकडे आहे. मला माहिती आहे की आत्महत्या करणं हे भित्रेपणाचं लक्षण आहे. मलाही जगायचं होतं. पण अशा जगण्याला काय अर्थ, जिथे शांतता आणि स्वाभिमान नाही. माझी बायको कांचन शर्मा आणि तिची आई वुनू शर्मा यांनी ना मला समजून घेतलं ना समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझी बायको शीघ्रकोपी आहे. तिचा आणि माझा स्वभाव जुळू शकत नाही” अशी पोस्ट संदीपने केली होती. (MS Dhoni Actor Sandeep Nahar Suicide Sushant Singh Rajput fans trend SSRiansFightBack)

“लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात सगळं बदललं”

“रोज सकाळ संध्याकाळ भांडणं. आता माझ्यात ऐकण्याची ताकद नाही. त्यात कांचनची काही चूक नाही. तिचा स्वभावच तसा आहे. तिला सर्वकाही नॉर्मल वाटतं, पण माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नाही. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी खूप वाईट वेळ पाहिली पण कधी अडलो नाही. डबिंग केलं. जिम ट्रेनर झालो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो. स्ट्रगल होतं पण समाधान होतं. आज मी खूप काही मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदललं आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटतं की सर्वकाही ठीक सुरु आहे. कारण ते फक्त आमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळं खोटं आहे. जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळं खोटं आहे”, असंही संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

इतकंच नाही तर संदीपने आपल्या पोस्टमध्ये बायकोच्या त्रासाबद्दल उल्लेख केला आहे. पण मी गेल्यानंतर तिला कुणी काही बोलू नये. कारण, तिला कधीही आपली चूक कळणार नाही, असंही संदीपने म्हटलंय.

संबंधित बातम्या :

अक्षय कुमारसोबत ‘केसरी’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

(MS Dhoni Actor Sandeep Nahar Suicide Sushant Singh Rajput fans trend SSRiansFightBack)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.