150 एटीएममध्ये क्लोनिंग, हजारो ग्राहकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीची अखेर मुंबई पोलिसांशी गाठ

मुंबईसह महाराष्ट्राभरात स्किमरच्या माध्यमातून क्रेडिट आणि डेबिट कार्डची (Mumbai ATM theft Gang) क्लोनिंग करुन फसवणूक करण्याऱ्या टोळीला मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने अटक केली आहे.

150 एटीएममध्ये क्लोनिंग, हजारो ग्राहकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीची अखेर मुंबई पोलिसांशी गाठ
Mumbai ATM theft Gang
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 11:49 AM

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्राभरात स्किमरच्या माध्यमातून क्रेडिट आणि डेबिट कार्डची (Mumbai ATM theft Gang) क्लोनिंग करुन फसवणूक करण्याऱ्या टोळीला मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने अटक केली आहे. क्राईम ब्रांचने या टोळीचा मास्टरमाईंड मोहम्मद फैजसोबत सिंडीकेटशी जोडलेल्या तीन आणखी लोकांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे (Mumbai ATM theft Gang).

‘चूहा’, ‘बड़ा चूहा’ कोडवर्ड

क्राईम ब्रांच युनिट 9 च्या तपासात अनेक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. क्राईम ब्रांचनुसार, फसवणुकीच्या या सिंडीकेटसोबत जोडलेल्या सर्व आरोपी लोकांची फसवणूक करण्यासाठी कोडवर्ड्सचा वापर करत असत. या फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्किमरच्या माध्यमातून ग्राहकाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा डाटा कॉपी होत होता. याला आरोपींना ‘चूहा’ हे कोडवर्ड दिलं होतं. तर, मॅग्नेटिक कार्ड रीडर, ज्याने मॅग्नेटिक कार्ड बनवलं जातं. त्याला ‘बड़ा चूहा’ असं कोडवर्ड दिलं होतं.

इतकंच नाही तर, ज्या ठिकाणी ही फसवणूक केली जात होती त्या तीन स्पॉटची क्राईम ब्रांचने ओळख केली आहे. ज्यामध्ये दोन मुंबईतील एक पुण्यातील आहे.

1000 पेक्षा जास्त लोकांची फसवणूक

चूहा आणि बड़ा चूहा याच्या माध्यमातून या गटाने आतापर्यंत जवळपास 1000 पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केली आहे. यांच्याजवळून जवळपास 149 क्रेडिट कार्ड आणि 22 डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींपैकी कोणीही 12 पेक्षा जास्त शिकलेले नाहीत. फैजने यापैकी तीन आरोपींना ग्राहकांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा डाटा कॉपी करण्याची जबाबदारी सोपण्यात आली होती. त्यामोबदल्यात त्यांना प्रत्येक कार्डमागे 500 रुपये मिळाळचे. तर इतर तीन आरोपींकडे सातारा, पुणे आणि सांगलीच्या एटीएममधून पैसे काढण्याची जबाबदारी होती. त्यांना एकूण रकमेच्या दहा टक्के मिळायचे (Mumbai ATM theft Gang).

पोलिसांनी सांगितलं की, हॉटेलमध्ये किंवा इतर दुकानांमध्ये काम करणारी व्यक्ती डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कार्डचा डाटा स्किमरच्या माध्यमातून कॉपी करत होता. इतकंच नाही तर तो चोरुन ग्राहकांचे कार्ड पिनही नोट करत असत. त्यानंतर या डाटाला लॅपटॉमध्ये कॉपी करताना फैज मॅग्नेटिक कार्ड रीडरच्या माध्यमातून कार्डचं क्लोन तयार करतात आणि त्यामध्ये चोरलेला गायब पिन टाकून खात्यातून पैसे उडवले जात होते.

Mumbai ATM theft Gang

संबंधित बातम्या :

तू माझा छळ करतो, मी आता दुसरे लग्न करेन, पत्नीच्या धमकीनंतर पतीचं भयानक कृत्य

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.