दुकानदार वळेपर्यंत सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स गुल, मुंबईतील चोरटा सीसीटीव्हीत कैद

चारकोप पोलीस स्टेशनच्या हद्दीत भारत भूषण बिल्डिंगमध्ये असलेल्या पद्मावती ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. (Mumbai Charkop Gold Thief )

दुकानदार वळेपर्यंत सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स गुल, मुंबईतील चोरटा सीसीटीव्हीत कैद
चारकोपमध्ये सोन्याच्या दुकानात चोरी
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 11:14 AM

मुंबई : ग्राहक असल्याचं भासवून सोन्याचे दागिने असलेला बॉक्स घेऊन पसार होणारा लुटारु मुंबईत सक्रिय झाला आहे. सोन्याचे पेंडंट्स दाखवण्यास सांगून दुकानदाराची मान वळताच आरोपी सोन्याचे दागिने लंपास करुन पोबारा करत असे. मुंबईतील चारकोप पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल करुन तपास सुरु केला आहे. मुंबईतील चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (Mumbai Charkop Gold Thief caught in CCTV)

चार फेब्रुवारीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. चारकोप पोलीस स्टेशनच्या हद्दीत भारत भूषण बिल्डिंगमध्ये असलेल्या पद्मावती ज्वेलर्समध्ये ही घटना घडली. 37 वर्षीय दुकानदार चेतन खिचा त्यावेळी दुकानात एकटाच होता. आरोपी ग्राहक असल्याचं भासवून दुकानात गेला.

दुकानदार वळेपर्यंत सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स गुल

मंगळसूत्रासाठी सोन्याचे पेंडंट्स दाखवण्यास त्याने सांगितलं. दुकानदार सोन्याच्या पेंडंट्सची डिझाईन्स दाखवत होता. आरोपीने त्याला आणखी डिझाईन्स दाखवायला सांगितली. दुकानदार दुसरा बॉक्स काढण्यासाठी वळला, तेवढ्यात आरोपी पहिला बॉक्स घेऊन पळाला. बॉक्समध्ये अडीच लाख रुपये किमतीचे दागिने असल्याची माहिती आहे.

पुण्यात ज्वेलर्सचं दुकान फोडलं

पुण्यात सोन्याचे दुकान फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विकीसिंह जालिंदरसिंह कल्याणी (31), विजयसिंह अंधासिंह जुन्नी उर्फ शिकलकर (19) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

सराईत चोरांनी 20 सप्टेंबर 2020 रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी निगडी येथील नवकार ज्वेलर्समधून 20 किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर 26 सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे सराफाचे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने गेल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली.

संबंधित बातम्या :

पुण्यातील सराफाची दुकाने फोडणारी टोळी गजाआड; एक कोटी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

ज्वेलर्सच्या बाजूला भाजीचं दुकान उघडलं, दोन महिने मुक्काम, संधी मिळताच भगदाड पाडून दरोडा

(Mumbai Charkop Gold Thief caught in CCTV)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.