AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : तोंड उघडलंस तर खबरदार, तुझ्या आईला.. धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार केला अत्याचार

ज्यूसमध्ये गुंगीचा पदार्थ मिसळून तिला तो प्यायला देण्यात आला, त्यानंतर आरोपींनी तिच्यासोबत हे दुर्दैवी कृत्य केले. घडलेल्या घटनेबाबत कोणालाही सांगितलं तर तुझ्या आईच्या जीवाचं बरं-वाईट होईल, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली. त्यामुळे ती तोंड बंद ठेवून अत्याचार सहन करत राहिली.

Mumbai Crime : तोंड उघडलंस तर खबरदार, तुझ्या आईला.. धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार केला अत्याचार
| Updated on: Sep 26, 2023 | 9:30 AM
Share

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : गेल्या काही दिवासंपासून शहरातील गुन्ह्यांच्या घटना (crime in mumbai) पुन्हा वाढीस लागल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्ह्याची आणखी एक भीषण घटना मुंबईत उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला (minor girl) फसवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलंडमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. तिच्या ज्यूसमध्ये गुंगीचा (spiked juice) पदार्थ मिसळून वारंवार हा अत्याचार करण्यात आला. तसेच त्या मुलीने तिचे तोंड उघडू नये म्हणून तिच्या आईला जीवे मारण्याची धमकीदेखील आरोपींनी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जून महिन्याच्या सुमारास घडली. तेव्हा पीडितेची आई घरी नव्हती. आरोपींपैकी एकाची पीडितेच्या आईशी ओळख होती. पीडित मुलगी घरात एकटी असताना तो याच ओळखीचा वापर करून घरात घुसला होता. अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध मिसळलेला ज्यूस प्यायला देण्यात आला, त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.

वारंवार केला अत्याचार, धमकीही दिली

या घटनेच्या तीन ते चार दिवसांनंतर पहिल्या आरोपीने (वय 37) त्याच्या मित्राला ( वय 21) त्याच्या या कृत्याबद्दल ( मुलीवर केलेल्या अत्याचाराबद्दल) सांगितले. त्यानंतर त्या दोघांनीही पीडितेची आई अनुपस्थित असताना पुन्हा घरात घुसण्याचा कट रचला.

एका आठवड्यानंतर, त्यांना संधी मिळाली आणि ते पुन्हा घरात घुसले. त्यांनी तीच पद्धत परत वापरून त्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. मात्र तिने तिचं तोंड उघडू नये, कोणालाही याबाबत सांगू नये म्हणून आरोपींनी तिला धमकीदेखील दिली. तोंड बंद ठेवलं नाहीस, तर आईच्या जीवाचं बर वाईट होईल, अशा शब्दांत आरोपींनी तिला धमकावलं. त्यामुळे ती मुलगी घाबरली आणि शांत बसून अन्यायसहन करत राहिली.

असा उघड झाला गुन्हा

तीनेक महिन्यांनंतर, पीडितेच्या आईला तिच्या मुलीच्या शरीरात काही बदल दिसू लागले, म्हणून तिने तिला रुग्णालयात नेले असता, ती मुलगी साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे तिला समजले. हे ऐकून तिला धक्काच बसला. तिने मुलीला विश्वासात घेऊन, प्रेमाने समजावले आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुलीने केलेला खुलासा ऐकून तिची ऑई शॉक झाली आणि तिने आरोपींविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या आईने मुलुंड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यात त्यांना यश मिळाले. मात्र दुसऱ्या आरोपीला कारवाईबद्दल कळताच तो फरार झाला असून पोलिस त्याचा अद्याप शोध घेत आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली असून विविध पथके परराज्यातही रवाना करण्यात आली आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.