Mumai Crime : मुंबईत मध्यरात्री चाकू हल्ला, एकजण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचारासाठी….
नालासोपाऱ्यात मध्यरात्री चाकू हल्ला, रात्रभर सोपारा गावात तणावाचे वातावरण, गंभीर जखमीला...
नालासोपारा – नालासोपाऱ्यात (Nalasopara) मध्यरात्री चाकू हल्ला करण्यात आल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गंभीर जखमीला रुग्णालयात (Mumbai Hospital)दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Nalasopara police) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्या व्यक्तीवरती उपचार सुरु आहेत. चाकू हल्ला झाल्यामुळे सोपारा गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या परिसरात रात्रभर पोलिसांची गस्त होती. कारण दोन गटातील वादामुळे चाकू हल्ला झाला आहे.
नालासोपारा पश्चिम सोपारा गावात इसमावर मध्यरात्री चाकूने हल्ला झाला. त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुसावीर दायर असे जखमी इसमाचे नाव असून, त्याला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. मस्जिदच्या ट्रस्टवर कोणी राहायचे यावरून झालेल्या वादातून हा चाकू हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत गैरकायद्याची मंडळी जमवून, प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी 5 जणांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इम्रान खान असे एका आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत अन्य 4 जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मस्जिद ट्रस्ट वरून वाद झाला असल्याने रात्रभर सोपारा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.