Mumbai Crime : पोलीस दिदींनी ‘गुड टच, बॅड टच’चा अर्थ सांगताच ‘त्या’ भडाभडा बोलल्या; त्यांची कहाणी ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’चा अर्थ आणि महत्वं शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेत आयोजित केलेल्या सेशनमुळे गुन्ह्याला वाचा फुटली. अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली.

Mumbai Crime : पोलीस दिदींनी 'गुड टच, बॅड टच'चा अर्थ सांगताच 'त्या' भडाभडा बोलल्या; त्यांची कहाणी ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 3:45 PM

मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : लैंगिक शोषणापासून बालकांचे, लहान मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी 2016 साली विशेष कायदा लागू झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांतर्फे “पोलीस दीदी” (police didi session) ही मोहीम हाती घेण्यात आली. अनेक घरे सुसज्ज नसल्यामुळे मुलांना शिक्षित करण्याची गरज आहे हे ओळखून तसेच मुलांसाठी सुरक्षित व असुरक्षित काय हे त्यांना कळावे यासाठी ‘गुड टच, बॅड टच’ (good touch bad touch) अर्थ समजावण्याची गरज असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले. या मोहिमेअंतर्गत साध्या वेशातील महिला पोलीस अधिकारी शाळांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’ विषयी शिकवतील, असे त्याचे स्वरूप आखण्यात आले.

पश्चिम उपनगरातील एका शाळेत 18 जुलै 2016 मध्ये असेच एक सेशन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही प्रश्न असतील तर ते विचारावे, असे मुलांना सांगितले असता एक धक्कादायक माहिती समोर आली. चौथ्या इयत्तेत शिकणारी एक मुलगी पुढे आली आणि तिने तिच्या घराजवळच्या दुकानात अंडी विकणाऱ्या इसमाबद्दल जे सांगितले, ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. अंडी विकणारा आणि लाँड्री चालवणारा तो माणूस आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श करत असल्याचे त्या चिमुरडीने सांगितले.

तिच्या पालकांनी तिला अंडी आणण्यास पाठवले, तेव्हा या प्रकाराची सुरूवात झाली. ती मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत त्या दुकानात गेली होती. पण त्या दुकानदाराने तिचा व मैत्रिणीचाही विनयभंग केल्याचे त्या मुलीने नमूद केले. ही माहिती समोर येताच दुसऱ्या दिवशी शाळेच्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या पालकांना बोलावले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी याप्रकरणी तक्रारही दाखल केली.

अनेक गुन्ह्यांना फुटली वाचा

मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर त्या मुलीच्या कबुलीनंतर आणखी चार मुलीही पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्यासोबतही असाच प्रकार झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्याच आरोपीने वर्षभराहून अधिक काळ आपल्याला असाच त्रास दिल्याचे त्या मुलींनी नमूद केले. त्यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान, पीडितांपैकी तिघींनी साक्ष दिली. झालेल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवानिशी मारेन, अशी धमकीही आपल्याला आरोपीने दिल्याचे (7 ते 11 वर्षे वयोगट) पीडित मुलींनी सांगितले.

त्याने आरोप नाकारले

मात्र याप्रकरणातील आरोपीने (वय ३०) सरळ हात वर करत आपल्याला चुकीच्या व खोट्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा केला. आपल्यावर खोटे आरोप करण्यासाठी मुलींवर जबरदस्ती केली जात असल्याचे आरोपीने सांगितले. मात्र 2018 साली, न्यायालयाने या आरोपीला लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरवलत त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.