AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅटूवरून लागला खुनाचा छडा, उलगडले ‘शीर’ नसलेल्या मृतदेहाचे रहस्य, दोघांना अटक

शुक्रवारी समुद्र किनाऱ्यावर सकाळी एक बॅग वाहून आली होती. त्या बॅगेत शीर नसलेला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र तिच्या हातावरील टॅटूच्या मदतीने पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेतला.

टॅटूवरून लागला खुनाचा छडा,  उलगडले 'शीर' नसलेल्या मृतदेहाचे रहस्य, दोघांना अटक
टॅटूवरून उलगडले खुनाचे रहस्य
| Updated on: Jun 03, 2023 | 4:48 PM
Share

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी एका पिशवीत सापडलेल्या शीर नसलेल्या महिलेच्या मृतदेहाचे (woman dead body) गूढ पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उकलले. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती आणि मेव्हण्याला अटक केली आहे. महिलेच्या हातावर बनवलेल्या टॅटूवरून (tattoo revealed secret of murder) या हत्येचे रहस्य उलगडले असून त्याद्वारेच पोलीस त्या दोन आरोपींपर्यंत पोहोचू शकले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा शिरच्छेद केलेल्या मृतदेहामुळे त्यांच्याकडे फारसा सुगावा नव्हता. मात्र महिलेच्या हातावरील टॅटू्च्या आधारे पोलिसांनी वसई-विरारमधील सुमारे 15-20 टॅटूच्या दुकानांवर छापे टाकले. या तपासणीत टॅटू बनवणाऱ्याने महिलेच्या हातावरील त्रिशूल आणि ओमचा टॅटू ओळखला. त्याच्याकडून मिळालेल्या सुगावाच्या आधारे महिलेची अंजली सिंग अशी ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. आणि अखेर तिचा पती मिंटू सिंग आणि मेहुणा चुनचुन सिंग यांना अटक केली.

काय आहे प्रकरण ?

भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळला. एल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत, पुढील तपास सुरू केला. मृत तरुणीच्या हातावर त्रिशूल आणि ओमचा टॅटू बनवलेला होता. पोलिसांनी त्याच टॅटूच्या आधारावर मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच घेतला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिंटू सिंगला पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. 24 मे 2023 रोजी दोघांमध्ये भांडण झाले आणि मिंटू सिंगने रागाच्या भरात चाकूने गळा कापून पत्नीचा खून केला. यानंतर घरात असताना त्याने धडापासून डोके वेगळे केले आणि भाऊ चुंचुनच्या मदतीने शीर नसलेला मृतदेह सुटकेसमध्ये भरून भाईंदरच्या खाडीत फेकून दिला.

त्यानंतर तो आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सासरी सोडून हैदराबादला गेला आणि तेथून पत्नीचे दागिने घेण्यासाठी तो मुंबईला परत आला. मात्र पोलिसांना त्या महिलेचा मृतदेह मिळाला आणि त्यांनी टॅटूवरून शोध घेतला. दोन्ही आरोपींना ते पळून जाण्याआधीच दादर स्थानकातून अटक करण्यात आली.

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.