Mumbai Crime | 17 किलो सोनं 8 कोटी किंमत, मुंबईतून चोरून राजस्थानात पुरलं, पोलिसांनी पर्दाफाश कसा केला ?
मुंबईमध्ये एक मोठ्या आणि धाडसी चोरीचा (Theft Of Gold) पर्दाफाश करण्यात आलाय. बारा दिवसांपूर्वी मुंबईच्या (Mumbai) लोकमान्य टिळक या परिसरातील सोन्याच्या दुकानातून 8.19 कोटी रुपयांचे तब्बल 17.4 किलो सोन्याची चोरी झाली होती. या जबरी चोरीमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती.
मुंबई : मुंबई म्हणजेच देशाची राजधानी. मोठी आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे येथे घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणदेखील खूप आहे. खून, दरोडा, लूट असे प्रकार तर नेहमीचेच ठरलेले आहेत. सध्या मात्र मुंबईमध्ये एक मोठ्या आणि धाडसी चोरीचा (Theft Of Gold) पर्दाफाश करण्यात आलाय. बारा दिवसांपूर्वी मुंबईच्या (Mumbai) लोकमान्य टिळक या परिसरातील सोन्याच्या दुकानातून 8.19 कोटी रुपयांच्या तब्बल 17.4 किलो सोन्याची चोरी झाली होती. या जबरी चोरीमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. मात्र मुंबई पोलिसांनी (Police) या चोरीमधील म्होरक्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच चोरी करण्यात आलेले सोने आणि रोख रकमेपैकी 89% चोरीचा माल पोलिसांनी परत मिळवलाय. मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
चार जणांनी पळवलं करोडो रुपयांचं सोनं
मुंबईच्या लोकमान्य टिळक परसिरात एखा मोठ्या सोन्याच्या दुकानातून 14 जानेवारी रोजी तब्बल 17.4 किलो सोन्याची चोरी करण्यात आली होती. या सोन्याची किंमत तब्बल 8.19 कोटी रुपये आहे. या सोन्यासोबतच चोरट्यांनी 8.57 लाख रुपयांची रोकडदेखील पळवली होती. या जबरी चोरीचा म्होरक्या याच दुकानात काम करणारा गणेश एच. के. देवासी तसेच इतर चार जण होते. चक्क करोडो रुपयांच्या या चोरीमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर होते. मात्र मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केलं आहे. तसेच या चोरीतील 89 टक्के माल पोलिसांनी परत मिळवला आहे. मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या यशानंतर मुंबई पोलिसांचे अभिनंद केले जातेय.
विश्वास नागरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली
Maharashtra | 10 accused arrested after LT Marg PS detected theft of 17.4kg gold worth Rs 8.19cr & Rs 8.57 lakh cash from a jewellery shop in Bhuleshwar on Jan 14 by an employee, Ganesh HK Devasi, &4 others. Recovery of 89% property made: Mumbai Joint CP L&O, Vishwas Nangre Patil pic.twitter.com/oVczAk5NIe
— ANI (@ANI) January 28, 2022
राजस्थानमध्ये ठेवलं सोन, पोलिसांच्या सहा पथकांकडून तपास
एवढ्या मोठ्या धाडसी चोरीचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी आपली पथके उत्तर प्रदेश तसेच राजस्थानमध्ये पाठवली होती. परराज्यात जाऊन मुंबई पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चोरीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांची एकूण सहा पथके काम करत होती. चोरट्यांनी चोरी केलेले सोने राजस्थानमधील सिरोही येथे एका शेतात पुरले होते. या गुन्ह्यात सुरुवातीला फक्त चार जणांचा समावेश होता. मात्र नंतर चोरट्यांनी इतर लोकांकडे सोने ठेवण्यासाठी दिले. तसेच चोरीसाठी अप्रत्यक्षपणे मदतच केली. या धाडसी चोरीचा उलगडा झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांची पुन्हा एकदा वाहवा केली जात आहे.
इतर बातम्या :
Crime | सासऱ्याचा खून करुन प्रियकरासोबत फरार, महिलेला सात दिवसांत बेड्या, हत्येचं नेमकं कारण काय ?