MP Bus Accident : मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू, सर्व मृतदेहांची ओळख पटली

सदर दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याबाबत विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

MP Bus Accident : मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू, सर्व मृतदेहांची ओळख पटली
Indore bus accidentImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 5:10 PM

मुंबई : मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस (Bus) नर्मदा नदीत कोसळून (Collapsed) झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू (Death) झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी दरम्यान हा अपघात घडला आहे. नदी पात्रातून आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्वांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एसटीचे चालक आणि वाहक यांचाही समावेश असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज सकाळी 7.30 सुमारास इंदोर येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी दरम्यान नर्मदा नदीच्या पुलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नदीत कोसळली. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याबाबत विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोधमोहिम सुरु असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. हा अपघात अत्यंत दुर्देवी असून असे प्रसंग टाळण्यासाठी महामंडळातर्फे उपाययोजना केल्या जातील, असे चन्ने म्हणाले. तसेच या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीला तातडीने चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.

दुर्घटनेतील मयतांची नावे पुढीलप्रमाणे

चंद्रकांत पाटील (45 चालक) प्रकाश चौधरी (वाहक), अविनाश परदेशी राजू तुलसीराम (35) जगन्नाथ जोशी (68) चेतन जागीड लिम्बाजी खाती सैफउद्दीन अब्बास अली बोहरा कल्पना पाटील (57) विकाश बेरहे (33) आरवा मुर्ताजा बोहरा (27) रुक्मिणीबाई जोशी

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.