Gas Pipeline Leakage : कांदिवलीत गॅसची पाईपलाईन फुटली, पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू असताना घडली घटना

पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदत असताना जेसीबीचा गॅसच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि गॅस लिकेज झाला. यानंतर तात्काळ परिसरातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला.

Gas Pipeline Leakage : कांदिवलीत गॅसची पाईपलाईन फुटली, पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू असताना घडली घटना
कांदिवलीत गॅसची पाईपलाईन फुटलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 9:28 PM

मुंबई : कांदिवली पश्चिमेला महावीर नगर परिसरातील क्रोमा मॉलसमोर सायंकाळी सातच्या सुमारास गॅसची पाईपलाईन (Gas Pipe Line) फुटली. गॅसची पाईपलाईन फुटल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस पसरला होता. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अग्नीशमन दलाकडून गॅस पाईपलाईन दुरुस्ती (Repair) करण्यात आली. पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदत असताना जेसीबीचा गॅसच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि गॅस लिकेज (Gas Leakage) झाला. यानंतर तात्काळ परिसरातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. कुणीही जखमी झाले नाही. दुरुस्तीनंतर गॅसचा पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे.

पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम करताना गॅस पाईपलाईनला धक्का लागला

कांदिवली पश्चिम महावीर नगर परिसरातील कल्पना चावला चौक येथे आज पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली होती. याबाबत महापालिकेकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने सदर ठिकाणी दाखल होत पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु केले. पाईलाईन दुरुस्तीसाठी जेसीबीने खोदकाम सुरु असताना गॅसच्या पाईपलाईन जेसीबीचा धक्का लागला आणि गॅसची पाईपलाईन लिकेज झाली. महावीर नगर हा हायप्रोफाईल परिसर असून, येथील संपूर्ण परिसराला गॅस पाईनलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जातो. गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने परिसरात गॅस पसरु लागला आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. डहाणूकरवाडी, दत्त मंदिर, महावीर नगर आणि वसंत कॉम्प्लेक्सची गॅस लाईन तात्काळ बंद करण्यात आली.

गॅस पाईपलाईन दुरुस्ती करत पुरवठा सुरळीत

याबाबत कांदिवली पोलीस आणि अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने युद्धपातळीवर गॅस पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले. जवळपास तासाभर अथक प्रयत्न करुन गॅस पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण केले. यानंतर परिसरातील गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला. पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करताना ही घटना घडली. मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. कुणालाही इजा झाली नाही. (A gas pipeline burst in Mahaveer Nagar in Kandivali)

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.