Video | अरे यार, हिनं तर खऱ्या अर्थानं ‘बाईट’ दिला! मुंबई पोलिसांच्या हाताला चावणारी ती कोण?

Mumbai Police bite : सोमवारी सकाळपासून काँग्रेसचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी मोठ्या संख्यने भाजपचं कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर अखेर मुंबई पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली होती.

Video | अरे यार, हिनं तर खऱ्या अर्थानं 'बाईट' दिला! मुंबई पोलिसांच्या हाताला चावणारी ती कोण?
महिला पोलिसाच्या हातावर चावणारी ती अटकेत!
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 4:06 PM

मुंबई : मुली चावतात, असं आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल. पण खरंच चावतात, याचा प्रत्यय आज मुंबई पोलिसांना आलाय. एका मुलीनं मुंबईतील महिला पोलिसाच्या हाताचा चावा (Girl bit on Mumbai lady police) घेतला. यानंतर महिला पोलिसांनी चावणाऱ्या या मुलीला ताब्यातही घेतलं. काँग्रेस आणि भाजपविरोधात (Congress vs BJP Protest) आज चांगलाच संघर्ष मुंबईत पाहायला मिळाला. त्यावेळीच ही घटना घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माध्यमांच्या कॅमेऱ्यातही ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. दोघा जणींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय होते, हे पाहणं महत्त्वाचंय. महिला पोलिस कर्मचारीच्या हाताला चावल्यानंतर महिला पोलिसाचा हातही चांगलाच सूजला होता. आता या दोघींवरही मुंबई पोलिस काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचीच नजर लागली असली तरी पोलिसांच्या हाताला चावणारी ती तरुणी कोण होती, असाही प्रश्न विचारला जातोय. सोमवारी सकाळपासूनच मुंबईत भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते (Bjp workers vs Congress workers) असा संघर्ष ताणला गेला होता. त्यात महिला कार्यकर्त्याही मागे नव्हत्या. अशातच एक महिला कार्यकर्ती चक्क महिला पोलिसाच्या हातालाच चावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

कोणत्या पक्षाची कार्यकर्ती?

सोमवारी सकाळपासून काँग्रेसचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी मोठ्या संख्यने भाजपचं कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर अखेर मुंबई पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. अखेर अनेकांना ताब्यातही घेण्यात आलं. दरम्यान, याच वेळी भाजप कार्यकर्त्या असलेल्या एका महिलेनं मु्ंबईत बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलिसाच्या हाताचाच चावा घेतला. यानंतर इतर महिला पोलिसांनी या महिलेला अक्षरशः ओढून नेत पोलिसांच्या गाडीत कोंबलं!

कशामुळे राडा?

महाराष्ट्राच अपमान मोदींनी केल्याच्या आरोपावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. यावरुन राज्यभर आंदोलनं सुरु आहेत. अशातच प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते सोमवारी आणखीनंच आक्रमक झाले होते त्यानंतर काँग्रेसनं सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. त्यानंतर महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या होत्या. या सगळ्यांची धरपकड सकाळपासून सुरु होती.

अखेर पोलिसांच्या आवाहनाला साद देत नाना पटोले यांनी आंदोलन थांबवत असल्याचं म्हटलं होतं. त्याआदी झालेल्या राड्यावेळी एका मुलीनं महिला पोलिसांसोबत केलेला चावण्याचा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक! – पाहा व्हिडीओ

पोलिसांनी अडवल्यानंतर भाजप नगरसेविका काय म्हणाली? पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत 21 वर्षीय तरुणाची हत्या, वर्गमित्राला अटक

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी, 23 तासांच्या चौकशीत काय मिळाल?

मुलीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आईच्या जीवावर, पालघरमध्ये शेजारी कुटुंबांत हाणामारी, 46 वर्षीय महिलेचा मृत्यू

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.