पत्नीचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याचा संशयातून पतीचे टोकाचे पाऊल, आधी मारहाण केली मग…
संशयातून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असतं. बसंत नेहमी संशयातून पत्नीचा मानसिक छळ करायचा. नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये याच कारणातून भांडण झाले.
मुंबई : पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने तव्याने मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. रिटा देवी असे मयत पत्नीचे तर बसंत शाहा असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय
रिटा देवी आणि बसंत शाहा दोघेही महापालिकेच्या क्वार्टरमध्ये रहात होते. तसेच दोघेही सार्वजनिक शौचालयात काम करायचे. बसंतला आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.
पतीच्या संशयामुळे दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे
यात संशयातून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असतं. बसंत नेहमी संशयातून पत्नीचा मानसिक छळ करायचा. नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये याच कारणातून भांडण झाले. त्यानंतर बसंतने स्वयंपाकघरातील तव्याने पत्नीला बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.
आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच दिवशी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.