मुंबईत तरुणीसोबत रेल्वे स्थानकात जे घडले ते अतिशय घृणास्पद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखतही नाहीत. आरोपी हा मानसिक रुग्ण आहे. सध्या बोरिवली जीआरपी पोलीस आरोपीला अटक करून पुढील कारवाई करत आहेत.

मुंबईत तरुणीसोबत रेल्वे स्थानकात जे घडले ते अतिशय घृणास्पद
गोरेगाव रेल्वे स्थानकात तरुणीसोबत घृणास्पद घटनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 6:41 PM

गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : पु्ण्यात डिलिव्हरी बॉयने तरुणीला किस देत विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईतही अशीच घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकात (Goregaon Railway Station Mumbai) ही धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास कामावर चाललेल्या 21 वर्षीय तरुणीला खुलेआम किस दिल्याची (Kiss the Girl) संतापजनक घटना गोरेगाव रेल्वे स्थानकात घडली आहे. याप्रकरणी बोरीवली जीआरपीने आरोपीला अटक (Accused Arrested by Borivali GRP) केली आहे.

तरुणी मार्केटिंग कंपनीत नोकरी करते

सदर पीडित तरुणी ही एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करते. तर आरोपी तरुण हा पेशाने इलेक्ट्रिशियन आहे. अमु कुमार सिंग असे 26 वर्षीय आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे.

सकाळी कामावर जात असताना घडला किळसवाणा प्रकार

पीडित तरुणी ही गोरेगाव रेल्वेस्थानकाच्या पुलावरुन सकाळी साडेनऊच्या सुमारास कामावर चालली होती. यावेळी आरोपी तरुण तिच्या मागे मागे आला आणि तिचे चुंबन घेऊन पळू लागला. यावेळी तरुणीने आरडाओरडा केला.

हे सुद्धा वाचा

तरुणीचा आरडाओरडा ऐकून नागरिक धावले

तरुणीचा आरडाओरडा ऐकून पुलावरील उपस्थित प्रवासी नागरिकांनी धावत त्याला पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. बोरीवली जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी मानसिक रुग्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखतही नाहीत. आरोपी हा मानसिक रुग्ण आहे. सध्या बोरिवली जीआरपी पोलीस आरोपीला अटक करून पुढील कारवाई करत आहेत. दिवसाढवळ्या भर स्थानकात तरुणीसोबत घडलेल्या या घटनेमुळे तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.