फटाके फोडण्यावरुन वाद, तीन अल्पवयीन मुलांनी तरुणाला भोसकले

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमी सुनीलला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

फटाके फोडण्यावरुन वाद, तीन अल्पवयीन मुलांनी तरुणाला भोसकले
फाटके फोडण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 9:01 PM

मुंबई : फटाके फोडण्यावरुन (Bursting Firecrackers) झालेल्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षीय तरुणाची मारहाण करत हत्या (Minor boys killed youth) केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी मुंबईतील शिवाजीनगर (Shivaji Nagar Mumbai) परिसरात घडली आहे. सुनील शंकर नायडू असे मयत तरुणाचे नाव आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

सोमवारी दुपारी एक 12 वर्षाचा मुलगा शिवाजीनगरमधील पारिख कंपाऊंडमध्ये बॉटलमध्ये फटाके फोडत होता. सुनील नायडूने त्याला फटाके फोडण्यास मनाई केली आणि तेथून पळवून लावले.

मारहाणीत तरुण गंभीर जखमी

यानंतर सदर अल्पवयीन मुलगा आपला 15 वर्षाचा भाऊ आणि 14 वर्षाचा मित्र यांना घेऊन आला. या तिघांनी मिळून सुनीलला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिघांनी सुनीलवर चाकूने वार केले. यात सुनील गंभीर जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमी सुनीलला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुनीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाजी नगर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु आहे. तर एक मुलगा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अकोल्यात संपत्तीच्या वादातून जावयाने केली मेव्हण्याची हत्या

संपत्तीच्या वादातून जावयाने मेव्हण्याची हत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये घडली आहे. शेख गफ्फार शेख मुनाफ असे 45 वर्षीय मयत इसमाचे नाव आहे. मयत आणि आरोपी यांच्यात गेल्या एक महिन्यापासून वाद सुरु होता.

यातूनच बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या गफ्फार शेख यांच्यावर त्यांच्या भावोजीने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गफ्फार शेख यांचा मृत्यू झाला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.