सार्वजनिक शौचालय वापरले मात्र पैसे न देताच निघाला, केयरटेकरने आयुष्यातूनच उठवला

दादर येथील बस स्टँडसमोरील सार्वजनिक शौचालयात राहुल पवार बुधवारी गेला होता. मात्र शौचालयाचा वापर केल्यानंतर पैसे न देताच राहुल चालला होता.

सार्वजनिक शौचालय वापरले मात्र पैसे न देताच निघाला, केयरटेकरने आयुष्यातूनच उठवला
पैशावरुन झालेल्या वादातून दादरमध्ये तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 4:24 PM

मुंबई : सार्वजनिक शौचालय वापरल्यानंतर पैसे न देताच निघून चाललेल्या युवकाचे केयरटेकरसोबत भांडण झाले. या भांडणातून केयरटेकरने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मुंबईतील दादर परिसरात घडली आहे. राहुल पवार असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर विश्वजीत सिंह असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. माटुंगा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शौचालयाचा वापर करुन पैसे न देताच चालला होता

दादर येथील बस स्टँडसमोरील सार्वजनिक शौचालयात राहुल पवार बुधवारी गेला होता. मात्र शौचालयाचा वापर केल्यानंतर पैसे न देताच राहुल चालला होता. यामुळे शौचालयाचा केयरटेकर विश्वजीतने त्याला अडवले.

पैशावरुन वाद झाला अन् वादातून हत्या

राहुल आणि विश्वजीत यांच्यात पैशावरुन वाद सुरु झाला. वादावादीदरम्यान आधी राहुलने विश्वजीतवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला प्रतिकार करताना विश्वजीतने लाकडी दांडक्याने राहुलच्या डोक्यात प्रहार केला. यात राहुलचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

माटुंगा पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलीस घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विश्वजीतलाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

डोंबिवलीत क्षुल्लक वादातून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

प्रेमसंबंधातील क्षुल्लक वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपीने दिलेल्या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.