मुंबईच्या रस्त्यावर महिलेचा केला होता पाठलाग; आरोपीची निर्दोष सुटका, न्यायालयाने ‘हे’ दिले कारण

आरोपीने तिचा तब्बल तीन महिने पाठलाग सुरू ठेवला होता. एवढा दीर्घकाळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी कशाची वाट बघत होती? असा सवाल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने उपस्थित केला.

मुंबईच्या रस्त्यावर महिलेचा केला होता पाठलाग; आरोपीची निर्दोष सुटका, न्यायालयाने 'हे' दिले कारण
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 4:10 PM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील बहुतांश रस्ते गजबजलेले असतात. अशा वर्दळीच्या रस्त्यांवरील गर्दीचा लाभ उठवत काही विकृत लोक तरूणी, अल्पवयीन मुली, महिलांची छेडछाड काढणे (Abusing) तसेच विनयभंगाचे (Molestation) गुन्हे करतात. अशाच प्रकारे मुंबईच्या एका रस्त्यावर आरोपीने तरूणीचा पाठलाग सुरू ठेवला होता. मात्र त्या आरोपीला मुंबईतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले (Acquitted by the Metropolitan Magistrate Court) आहे.

सकाळच्या सत्रातील पीक अवर्सला फुटपाथवरून चाललेल्या तरुणीचा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आरोपीने दुचाकीवरून पाठलाग सुरू ठेवणे अशक्य आहे, असे मत व्यक्त करीत महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 40 वर्षांच्या आरोपीला निर्दोष सोडले आहे.

तरुणीचा तीन महिने पाठलाग सुरू केल्याचा आरोप

आरोपीने तक्रारदार पीडित तरुणीचा जवळपास तीन महिने पाठलाग केल्याचा आरोप होता. मात्र पीडित तरुणीने दिलेल्या जबाबावर विश्वास ठेवण्यास महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालय स्पष्ट नकार दिला.

हे सुद्धा वाचा

कथित प्रकार हा सकाळच्या सुमारास घडला ही गोष्ट वर्णन करण्यापलीकडची आहे, असे मत महानगर न्यायदंडाधिकारी यशश्री मरूळकर यांनी निकाल देताना व्यक्त केले.

मुंबईतील वर्दळीचा रस्ता आणि वेळेची परिस्थिती लक्षात घेता तक्रारदार तरुणीच्या मूळच्या जबाबावर विश्वास ठेवणे कठीण आहे, असेही महानगर न्यायदंडाधिकारी यांनी नमूद केले आहे.

तरुणीने तातडीने पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही?

तरुणीने आरोपीविरोधात पोलीस स्टेशनला तातडीने तक्रार का दाखल केली नाही? तिच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिचा तब्बल तीन महिने पाठलाग सुरू ठेवला होता. एवढा दीर्घकाळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी कशाची वाट बघत होती? असा सवाल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने उपस्थित केला.

रस्त्याच्या एका टोकाला आरोपीचे गॅरेज आहे. त्याच गॅरेजच्या परिसरात तरुणी राहते. तिने स्वतःचा पाठलाग केल्याचा केलेला आरोप खोटा आहे, असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी बचाव पक्षाचा हा दावा ग्राह्य धरत आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.