Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत ब्लेडने वार, गुन्हे शाखेकडून आरोपीला बेड्या

घरामध्ये काही कारणावरुन वाद झाल्याने पीडित मुलगी घर सोडून लोअर परळ स्टेशन परिसरात आली होती. यावेळी मुलीला एकटी बघून या नराधमाने आधी तिच्याशी ओळख केली. मग स्टेशन परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करत ब्लेडने वार केले.

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत ब्लेडने वार, गुन्हे शाखेकडून आरोपीला बेड्या
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत ब्लेडने वारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 5:14 PM

मुंबई : लोअर परळ स्टेशन परिसरात एका 14 वर्षीय मुलीवर ब्लेडचे वार (Blade Attack) करून बलात्कार (Rape) करणाऱ्या नराधमाला मुंबई रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. हरीश कुमार गुप्ता असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर याआधी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने अशी किती कृत्य अजून केली आहेत याबाबत पोलीस तपास करत आहेत. पीडित मुलीवर 10 जुलै रोजी बलात्कार झाला होता. मुलीने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी कसून शोध घेत 15 दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीला 15 दिवसात पोलिसांनी केले अटक

घरामध्ये काही कारणावरुन वाद झाल्याने पीडित मुलगी घर सोडून लोअर परळ स्टेशन परिसरात आली होती. यावेळी मुलीला एकटी बघून या नराधमाने आधी तिच्याशी ओळख केली. मग स्टेशन परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करत ब्लेडने वार केले. नराधमाच्या तावडीतून सुटका करत मुलगी घरी आली आणि घडला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र घटना रेल्वे हद्दीत घडल्याने गुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलीस आयुक्त कैसर खालीद यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई रेल्वे गुन्हे शाखेने विविध टीम बनवून आरोपीचा शोध सुरु केला. तपासादरम्यान आरोपी हरिश कुमार गुप्ता चर्चगेट परिसरात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चर्चगेट परिसरातून आरोपीला अटक केले. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. (Accused who assaulted a minor girl with a blade was arrested by the crime branch)

हे सुद्धा वाचा

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.