Anil Deshmukh: अनिल देशमुखांनी बार मालकांकडून हफ्ता गोळा करायला सांगितला नाही, एसीपी संजय पाटील यांचा खुलासा
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील यांना मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपये हफ्ता गोळा करायचे आदेश दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. हा आरोप एका पत्राद्वारे परमबीर सिंग यांनी केला होता.
मुंबई : न्या. चांदीवाल आयोगात आज महत्वपूर्ण सुनावणी झाली. आयोगात आज एसीपी संजय पाटील यांची उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी आपल्याला बार मालकाकडून हफ्ता गोळा करायला सांगितलं नाही, असा खुलासा आयोगा समोर केला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील यांना मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपये हफ्ता गोळा करायचे आदेश दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. हा आरोप एका पत्राद्वारे परमबीर सिंग यांनी केला होता. या पत्राच्या आधारावर पुढे जनहित याचिका दाखल झाली आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर या 100 कोटींच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. चांदीवाल आयोगाची नेमणूक केली आहे. आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, संजीव पालांडे, पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील आणि एपीआय सचिन वाझे या आयोगाचे साक्षीदार आहेत. आयोग यांची साक्ष घेत असतात तर साक्षीदार इतर साक्षीदारांची उलट तपासणी घेत असतात.
देशमुख यांच्यासोबत आमची कार्यालयीन कामासाठी मीटिंग झाली होती
चांदीवाल आयोगा समोर आज एसीपी संजय पाटील यांचा जबाब नोंदवण्याची आणि उलट तपासणी घेण्याची प्रक्रिया झाली. त्यांची उलट तपासणी अनिल देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी केली. यावेळी कुलकर्णी यांनी संजय पाटील यांना आपल्याला अनिल देशमुख यांनी कधीही हफ्ता गोळा करायला सांगितलं नाही, अशी माहिती दिली. अनिल देशमुख यांच्यासोबत आमची कार्यालयीन कामासाठी मीटिंग झाली होती. या मीटिंगला ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड येथील सुमारे 25 ते 30 वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. ही मिटींग विधानसभा अधिवेशनात येणाऱ्या प्रश्नांबाबत होती. या मीटिंगमध्ये अनिल देशमुख यांनी कोणत्या प्रकारे हफ्ता गोळा करण्याबाबत सांगितलं नाही. त्याचप्रमाणे मी परमबीर सिंग यांना आधीपासून ओळखतो. माझी मुंबईत बदली झाल्यावर त्यांनीच माझी नियुक्ती समाजसेवा शाखेचे एसीपी म्हणून केली होती. ते माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या दबावाखाली मी त्यांना व्हॉट्सअपवर उत्तरं दिली आहेत.
पालांडे यांच्यासोबत वैयक्तिक मैत्री नाही
यानंतर संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी एसीपी संजय पाटील यांची उलटतपासणी केली. यावेळी आपण मुंबई पोलीस दलात येण्यापूर्वी संजय पालांडे यांना वैयक्तिक ओळखत नव्हतो. माझी त्यांच्यासोबत वैयक्तिक मैत्री नाही. संजीव पालांडे हे गृहमंत्री यांचे पीए असताना मी कधीही त्यांच्याशी संवाद साधला नाही. 1 मार्च 2021 रोजी कार्यालयीन कामासाठी मीटिंग झाली होती. त्या मीटिंगला पालांडे हे हजर होते. यावेळी मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. पालांडे यांनी मला कधी ही फोन केलेला नाही किंवा sms केलेला नाही, असं आयोगाला सांगितलं. (ACP Sanjay Patil’s disclosure before Chandiwal Commission in Anil Deshmukh recovery case)
इतर बातम्या
मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, काँग्रेस म्हणते, निर्णय चांगला, पण…