अगरवूड तेलाची बेकायदा विक्री करणारा कारखाना उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

अगरवूड हे भारतात फक्त आसाममध्ये मिळते. हे संरक्षित वनसंपत्ती असल्यामुळे त्याच्या लाकडाच्या किंवा तेलाच्या विक्रीवर प्रतिबंध आहे.

अगरवूड तेलाची बेकायदा विक्री करणारा कारखाना उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
अगरवूड तेलाची बेकायदा विक्री करणारा कारखाना उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 4:50 PM

मुंबई : आसामच्या जंगलामधून तस्करीच्या माध्यमातून मुंबईत आणली गेली प्रतिबंधित अगरवूड लाकूड तसेच अगरवूड तेलाची बेकायदा विक्री करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. पोलीस सध्या या तस्करीमागील संपूर्ण रॅकेटचा शोध घेत आहेत. (Agarwood oil factory destroyed; Mumbai police arrested both)

पोलीस व वन विभागाची संयुक्त मोहीम

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा -1 च्या पोलीस अधिकाऱ्यांना तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. डोंगरी परिसरात काही लोक प्रतिबंधित अगरवूड लाकूड आणि अगरवूड तेलाची अनधिकृतरित्या विक्री करीत असल्याची गोपनीय खबर होती. अगरवूड ही प्रतिबंधित वनसंपदा आहे. त्यामुळे गुन्हे शाखा आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली आणि 18 जुलैच्या संध्याकाळी डोंगरीच्या रूम क्रमांक 209 सेंट्रल हाऊस खड़क चिंचबंदर डोंगरी येथे धाड टाकली. पोलिसांना तेथे अगरवूड लाकूड आणि अगरवूड तेल बनविणारा कारखानाच निदर्शनास आला. छाप्यादरम्यान पोलिसांनी 21 किलोपेक्षा जास्त अगरवूड आणि 14 किलो अगरवूड तेल जप्त केले. हे सर्व रॅकेट चालविणाऱ्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

भारतात फक्त आसाममध्ये मिळते अगरवूड

अगरवूड हे भारतात फक्त आसाममध्ये मिळते. हे संरक्षित वनसंपत्ती असल्यामुळे त्याच्या लाकडाच्या किंवा तेलाच्या विक्रीवर प्रतिबंध आहे. जर अशी विक्री करायची असेल तर त्यासाठी संबंधित विभागाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते मात्र, दोन्ही अटक आरोपींनी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. ते आसामच्या जंगलातून अगरवूड तस्करीच्या माध्यमातून मुंबईत आणून त्याची अनधिकृतरित्या विक्री करायचे. या लाकडापासून तेल बनवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते, असे गुन्हे शाखा क्रमांक 1चे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

अगरवूड तेलाची देशविदेशात मागणी

अगरवूड तसेच अगरवूड तेलाची देशभरात सतत मागणी असते. एवढेच नव्हे तर या तेलाची गल्फ कंट्री दुबई आणि इतर देशातही जास्त मागणी आहे. विशेष करून अरबचे शेख लोक या अगरवूड तेलाचा सुगंधी परफ्युम म्हणून जास्त वापर करतात. या लाकडाच्या एका तुकड्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असते. सुगंधी चंदनाच्या लाकडापेक्षाही अगरवूडची किंमत जास्त असते. (Agarwood oil factory destroyed; Mumbai police arrested both)

इतर बातम्या

महापौर किशोरी पेडणेकर ठणठणीत, दोन दिवसानंतर ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज

Birth Anniversary : अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’मध्ये काम करण्यास उत्सुक होते राजेंद्र कुमार, अपूर्णच राहिली इच्छा!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.