Ambarnath crime : ‘शांतपणे आले, ट्रे घेतले, निघून गेले’ अंबरनाथमधील दूध चोर सीसीटीव्हीत कैद

Ambarnath Milk Theft : दुचाकीवर मागे बसलेला एक जण उतरतो. एकएक करुन ट्रे काढतो आणि थेट बाईकवर ठेवतो.

Ambarnath crime : 'शांतपणे आले, ट्रे घेतले, निघून गेले' अंबरनाथमधील दूध चोर सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथमधील दूधचोरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 6:33 AM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambarnath News) सध्या दूध चोरांनी धुमाकूळ घातलाय. अंबरनाथ पूर्वेत गेल्या 10 दिवसात दूध चोरीच्या 3 घटना घडल्या असून यापैकी एक घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. अंबरनाथ (Ambarnath Crime News) शहरातील दूध विक्रेत्यांना दुधाच्या पिशव्या देण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळी ट्रक येतो. हा ट्रक ठराविक ठिकाणी दुधाचे ट्रे उतरवून पुढे निघून जातो. यानंतर दूध विक्रेते (Milk vendors) पहाटेच्या सुमारास येऊन हे दूध घरोघरी वितरित करतात. दरम्यानच्या काळात ट्रे उतरवल्यापासून तिथे दूधविक्रेते लगेच येत नसल्याचं हेरून काही चोरट्यांनी दूध चोरी करायला सुरुवात केलीये. अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर परिसरात समीर सावंत यांची विघ्नहर डेअरी आहे. या डेअरीच्या बाहेर असेच उतरवण्यात आलेले दुचाचे तीन ट्रे 2 जून रोजी पहाटेच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चोरून नेले. यानंतर ३ जून रोजी दुधाचे 7 ट्रे, तर 11 जून रोजी दुधाचे 9 ट्रे चोरून नेण्यात आले. यापैकी 2 तारखेची घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.

यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन जण दुधाचे ट्रे उचलून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसतायत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शिवाजीनगर पोलिसांना सुद्धा देण्यात आले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात स्वारस्य न दाखवता तपास करून सांगतो, असं उत्तर दिल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं या घटनांकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष न करता या चोरट्यांना पकडून अद्दल घडवण्याची मागणी आता केली जातेय.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये काय दिसलं?

व्हिडीओमध्ये दोनवरुन बाईकवर येताना दिसतात. दुधाचे ट्रेक रस्त्याच्या कडेला एकावर एक ठेवण्यात आलेले आहेत. बाईकवर येताच दोघे दुधाच्या ट्रे शेजारी थांबतात. त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेला एक जण उतरतो. एकएक करुन ट्रे काढतो आणि थेट बाईकवर ठेवतो. एकूण तीन ट्रे काढून घेतल्यानंतर तो पुन्हा बाईकवर बसतो आणि निघून जातो. पहाटे चार साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रथमदर्शनी पाहता ही खरंच चोरी आहे का, अशी शंकाही येते. कारण अतिशय शांतपणे दोघे बाईकवरुन येतात. कोणतीही गडबड, धांदल न करता तीन ट्रेक काढून घेतात आणि जणू काही दुधाचे ट्रे आपलेच आहेत, अशा थाटात तिथून निघून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल आहेत.

पाहा व्हिडीओ :

गेल्या काही दिवसांत दूधचोरीचे हे प्रकार वाढल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. त्यामुळे या चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी होतोय. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथ पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय. मात्र तोपर्यत अंबरनाथमधील दूध चोरट्यांचा सुळसुळाट दूध विक्रेत्यांना धास्तावतोय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.