Video : अंबरनाथच्या चिंचपाडामध्ये हाणामारी! तरुणांच्या मारामारीत मुस्लिम महिला का मध्ये पडल्या? पाहा

Ambarnath Crime News: अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या हद्दीत निषाद सय्याद आणि नझीर शेख हे वास्तव्यास आहेत. कारने आले असता सलमान शेख या तरुणाला दोघा तरुणांकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

Video : अंबरनाथच्या चिंचपाडामध्ये हाणामारी! तरुणांच्या मारामारीत मुस्लिम महिला का मध्ये पडल्या? पाहा
अंबरनाथमध्ये राडा..Image Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 2:17 PM

अंबरनाथमध्ये (Ambarnath News) एका तरुणाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडलीये. चिंचपाडा (Chichpada Fight Video) परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Video) कैद झाली असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात सलमान शेख हा तरुण 12 ऑगस्ट रोजी रस्त्याने जात होता. यावेळी त्याला निषाद सय्यद आणि सिद्दीक चौधरी या दोघांनी रस्त्यावर पाडून मारहाण केली. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला. मारहाण करणारा निषाद सय्यद याची आई झुलेखा सय्यद या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. मात्र या प्रकरणात राजकारणाचा काहीही संबंध नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. झुलेखा सय्यद आणि बांधकाम व्यावसायिक नझीर शेख यांचे कौटुंबिक वाद असून सलमान या नझीर शेख यांच्याकडे काम करतो. त्याच वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलंय.

नेमकं काय घडलं?

मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. यात दोघे तरुण एका सफेद शर्टातील तरुणाला पाठीला धरुन रस्त्यावर आदळतात. त्यानंतर त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करतात.या भांडणात दोन महिला पडतात. मारहाण करणाऱ्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न करतात. भरस्त्यामध्येच हा सगळा राडा पाहून लोकंही जमा झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

पोलिसांनी काय म्हटलं?

अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या हद्दीत निषाद सय्याद आणि नझीर शेख हे वास्तव्यास आहेत. कारने आले असता सलमान शेख या तरुणाला दोघा तरुणांकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. शेख आणि सय्यद या कुटुंबीयांने एकमेकांशी संबंध होते. शेख यांच्या मुलीचं सय्यद यांच्या कुटुंबात लग्न लावून देण्यात आलं होतं. पण पुढे जाऊन हे लग्न मोडलं आणि घटस्फोटही घेण्यात आला होता, अशी माहिती अंबरनाथ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

राजेंद्र कोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही संबंधित कुटुंबीयांच्या एकमेकांविरोधात तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, आता मारणाहीची घटना घडल्यानंतर परस्परविरोधीत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.