Ambernath : 6 महिन्यांचं बाळ अचानक तडफडू लागलं, डॉक्टरकडे नेईपर्यंत वेळ निघून गेली!

अंबरनाथ येथील धक्कादायक घटना! नेमकं सहा महिन्याच्या बाळासोबत काय घडलं? वाचा सविस्तर

Ambernath : 6 महिन्यांचं बाळ अचानक तडफडू लागलं, डॉक्टरकडे नेईपर्यंत वेळ निघून गेली!
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 8:35 AM

अंबरनाथ : घशात मासा अडकून अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतेय. अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात सरफराज अन्सारी हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांना शहबाज अन्सारी नावाचा 6 महिन्यांचा मुलगा होता. गुरुवारी रात्री शहबाज हा घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत असताना तो अचानक तडफडू लागला होता.

6 महिन्याच्या चिमुकला अचानक तडफडू लागल्यानं इतर मुलं घाबरली. त्यांनी चिमुकल्याच्या आईवडिलांना लगेचच सांगितलं. शहबाजची तडफड पाहून त्याचे आईवडिलही धास्तावले. नेमकं काय झालंय, हे त्यांनाही कळत नव्हतं. शहबाजला डॉक्टरांकडून घेऊन जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक उरला नव्हता.

अखेर शहबाजच्या पालकांनी त्याला घेऊन एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तिथे त्याला नेमकं काय झालं आहे? याचं निदान होऊ शकलं नाही. त्यामुळे त्याला घेऊन आईवडिलांनी उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डॉक्टरांनी शहबाज याला तपासलं असता त्याच्या घशात मासा अडकल्याचं आणि त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. हा मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढला. यानंतर आता सकाळी या बाळाचं शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण शोधून काढलं जाणार असल्याची माहिती शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश म्हस्के यांनी दिली आहे.

या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलायय. तसंच आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज सुद्धा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. अंबरनाथ परिसरात या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.