Goregaon Woman Death : मध्यरात्री अचानक आवाज झाला, लोकांनी जाऊन पाहिले तर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2:15 च्या सुमारास गुलराज टॉवरमध्ये राहणाऱ्या लोकांना अचानक मोठा आवाज आला. लोकांनी बाहेर जाऊन पाहिले असता, एका मॅक्सी घातलेल्या महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला होता.

Goregaon Woman Death : मध्यरात्री अचानक आवाज झाला, लोकांनी जाऊन पाहिले तर...
पालघरमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्याने जीवन संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 10:46 PM

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील लक्ष्मीनगर भागातील गुलराज टॉवरच्या आवारात बुधवारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे वय सुमारे 45 वर्षे असल्याचे समजते. बांगूर नगर पोलीस या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2:15 च्या सुमारास गुलराज टॉवरमध्ये राहणाऱ्या लोकांना अचानक मोठा आवाज आला. लोकांनी बाहेर जाऊन पाहिले असता, एका मॅक्सी घातलेल्या महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला होता. महिलेच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे तिची ओळखणे पटवणे कठिण झाले आहे.

ज्या ठिकाणी मृतदेह सापडला, तेथे सीसीटीव्ही नव्हते. अशा स्थितीत महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करुन खाली फेकले याबाबत माहिती मिळणे मुश्किल आहे.

या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी तात्काळ बांगूर नगर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी इमारतीचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर जप्त केला असून, सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हे सुद्धा वाचा

संबंधित 22 मजली इमारत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहे. या टॉवरमध्ये 500 हून अधिक फ्लॅट आहेत. येथील बहुतांश लोक भाड्याने राहतात. या टॉवरला अद्याप भोगवटा प्रमाणपत्रही मिळालेले नाही.

बिल्डर किंवा या टॉवरची देखभाल करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती या इमारतीच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हा टॉवर समाजकंटकांचा अड्डा बनला आहे.

येथे लोक दारू पिऊन गोंधळ घालण्यासाठी येतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. बहुतांश घरमालकांनी येथे फ्लॅट भाड्याने दिले असून ते इतरत्र राहतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार काही फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेटही सुरू आहे. संबंधित प्रकरणाच्या तपासासोबतच बांगूर नगर पोलिसांनी प्रत्येक फ्लॅटमधील रहिवाशांचीही चौकशी करावी, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.