VIDEO: तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न, कल्याणमधील धक्कादायक घटना

कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांचा उच्छाद सुरू असल्याचं समोर आलंय. या तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदारांनी मलंगगडच्या पायथ्याशी फिरायला आलेल्या दोन तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केलाय.

VIDEO: तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न, कल्याणमधील धक्कादायक घटना
मलंगगड मारहाण प्रकरणातील पीडित तरुणी
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 8:16 AM

कल्याण : कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांचा उच्छाद सुरू असल्याचं समोर आलंय. या तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदारांनी मलंगगडच्या पायथ्याशी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला. या धक्कादायक घटनेमुळे मलंगगड परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

“दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग”

संबंधित युवक मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 6 ते 8 टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत या चौघांना बेदम मारहाण केली. आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. ही घटना रविवारी (1 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली.

“पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ, सोशल मीडियावर वाचा फोडल्यानंतर दखल”

अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी आधी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर नेवाळी पोलीस चौकी गाठली. तेथे या प्रकाराची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार होणार नाही. हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असं सांगत तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

“तरुणींनी कोणता पेहराव करायचा हे ठरवण्याचा अधिकार टवाळखोरांना कुणी दिला?”

या घटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार टवाळखोरांना कुणी दिला? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अशा समाज कंटकांवर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटनस्थळी देखील स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

हेही वाचा :

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा

व्हिडीओ पाहा :

Attack and molestation of 2 girls tourist near Malang gad Kalyan

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.