Badlapur Crime : बदलापूरमध्ये आदिवासी मुलीवर बलात्कार करून गर्भपात करण्याचा प्रयत्न! दोघांना अटक

Badalapur Rape News : बदलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संतापजनक कृत्य एका आदिवासी तरुणीसोबत घडलंय. शमशान अन्सारी असं या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे.

Badlapur Crime : बदलापूरमध्ये आदिवासी मुलीवर बलात्कार करून गर्भपात करण्याचा प्रयत्न! दोघांना अटक
पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 6:43 AM

बदलापूर : बदलापुरातून (Badalapur Crime News) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडीओही तयार करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Rape Viral Video) करण्याची धमकी देत पीडितेवर तरुणाने तब्बल चार महिने संतापजनक कृत्य केलंय. ही धक्कादायक घटना आता समोर आली असून याप्रकऱणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. तसंच दोघांना अटकही करण्यात आलीय. विशेष बलात्कार करण्यात आलेल्या पीडित तरुणी गर्भवती राहिल्याचं समजल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आला. रुग्णालयात घेऊन यात या पीडितेचा गर्भपात करण्यासाठी अत्याचार करण्यात आलेल्या आरोपीच्या मित्रांनी प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी (Badalapur Rape) दोघांना अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध अद्यापही सुरु आहे. बलात्काराच्या गुन्ह्यासह एट्रॉसिटी कायद्याअंतर्गही बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आदिवासी तरुणीसोबत संतापजनक कृत्य

बदलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संतापजनक कृत्य एका आदिवासी तरुणीसोबत घडलंय. शमशान अन्सारी असं या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. शमशाद अन्सारी आणि पीडित तरुणी हे एकाच कारखान्यात कामाला होते. याच दरम्यान पीडित तरुणीच्या जेवणात गुंगीचा औषध मिसळून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अन्सारी यांनी तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान अत्याचाराचा व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडित तरुणीवर चार महिने अत्याचार करत होता.

हे सुद्धा वाचा

दोघांना अटक

पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने अन्सारी याचे मित्र सागर कदम आणि मुकेश दिनगर यांनी तिचा रुग्णालयात येऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. या संबंधीच्या तक्रारीनंतर हे सर्व धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी बलात्कार, गर्भपात करण्याचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केलाय. सध्या मुख्य आरोपी अन्सारी हा अजूनही फरार आहे, तर गर्भपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.