CCTV : ‘मंगळसूत्र सुंदरंय’ म्हणत गंडवलं, बदलापुरात महिलेचं मंगळसूत्र लांबवलं! कसं? पाहा व्हिडीओ

Badlapur crime news : विश्वास नसेल तर माझा मोबाईल नंबर आणि माझ्या हातातलं सोन्याचं कडं तुमच्याकडे ठेवा', असं म्हणत त्यांन विश्वास संपादन केला होता.

CCTV : 'मंगळसूत्र सुंदरंय' म्हणत गंडवलं, बदलापुरात महिलेचं मंगळसूत्र लांबवलं! कसं? पाहा व्हिडीओ
मंगळसूत्र लांबवलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 7:11 AM

बदलापूर : दुचाकीवरुन येऊन सोनसाखळी चोरी (Chain snatching) करण्याच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेतच. त्यासाठी काळजी आणि सतर्कता बाळगण्याचीही गरज आहेच. पण त्याही पेक्षा जास्त सतर्कता बाळगण्याची गरज आहे, ती बोलण्याच्या नादात गुंतवून गंडवणाऱ्यांना सावध राहण्याची. गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात एका महिलेला अडकवून तिचं मंगळसूत्र लांबवण्याची घटना उघडकीस आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही देखील समोर आलंय. एका महिलेनं स्वतः चोराला मंगळसूत्र (Mangal sutra) गळ्यातून काढून दिलं. त्यानंतर हा चोर मंगळसूत्र घेऊन पसार झाला. एका कपड्यांच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या भामट्यानं ही चोरी केली. ज्वेलर्स व्यापारी असल्याचं सांगत या भामट्या ग्राहकानं महिलेला गंडा घातला. कपड्याच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Theft CCTV Video) हा सगळा प्रकार कैद झाला आहे. बदलापूर पश्चिमेच्या बेलवली परिसरात दुर्गा कलेक्शन नावाचं महिलांच्या कपड्यांचं दुकान आहे. या दुकानात इंदू उतेकर या महिला काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी त्या दुकानात असताना एका व्यक्तीने दुकानात येत ड्रेस दाखवण्यास सांगितलं. ड्रेस खरेदी करुन झाल्यानंतर या भामट्यानं महिलेच्या मंगळसूत्राची तारीफ केली आणि त्यानंतर हे मंगळसूत्र लांबवलंय. 29 एप्रिल रोजी चोरीची ही घटना घडली होती.

नेमकं काय घडलं?

बेलवली परिसरात दुर्गा कलेक्शन या कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या महिलेसोबत विचित्र प्रकार घडला. इंदू उतेकर ही महिला या दुकानात काम करते. यावेळी कपडे खरेदी करण्याच्या बहाण्यानं एक जण आला आणि त्यानं ड्रेस दाखवण्यास सांगतिलं. दाखवलेल्या ड्रेसपैकी दोन ड्रेस पसंत करून त्यानं दुकानमालक दिपाली महाले यांना कॉल केला आणि किंमत कमी करून घेतली. त्यानंतर या इसमाने इंदू उतेकर यांना ‘तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुंदर आहे, मी सोन्याचा व्यापारी असून माझी तीन दुकानं आहेत. मला हे मंगळसूत्र द्या, मी त्याचा छापा मारून काही वेळात तुम्हाला परत आणून देतो’, असं सांगितलं.

मात्र इंदू यांनी त्याला नकार देताच ‘मी तुमच्या दुकानाच्या मालक दीपाली महाले यांच्या ओळखीचा असून तुमच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरासुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आणि विश्वास नसेल तर माझा मोबाईल नंबर आणि माझ्या हातातलं सोन्याचं कडं तुमच्याकडे ठेवा’, असं म्हणत त्यांना इंदू उतेकर यांचा विश्वास संपादन केला.

आता मालकीण असलेल्या महिलेचं नाव सांगत आपल्या हातातलं कडं देण्याचंही ग्राहक सांगतोय, हे पाहून इंदू यांनाही तो जे म्हणतोय ते खरंच वाटलं. यांनी त्यांचं मंगळसूत्र या भामट्याकडे दिलं. यानंतर हा भामटा त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून निघून गेला, तो परत आलाच नाही. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं इंदू उतेकर यांना लक्षात आलं. त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या भामट्याचा सध्या शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर अशाप्रकारे बोलण्याच्या नादात गुंतवून गंडवणाऱ्यांपासून सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

पाहा व्हिडीओ :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.