CCTV : एका अपघातातून वाचले, इतक्यात दुसरी गाडी येऊन जोरात धडकली! 5 जण जागीच…
अपघात इतका भीषण होता की चार पैकी तीन वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला! अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती
मुंबई : वांद्रे वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे भीषण अपघात (Bandra worli Sea Link Accident CCTV Video) झाला. सुरुवातीला 2 वाहनांचा अपघात झाला होता. या अपघातामधील जखमींना रुग्णवाहिकेत (Ambulence) शिफ्ट केलं जात होतं. त्याच वेळी एका भरधाव कार सी लिंकवर उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगेत घुसली. ही जबर इतकी धडक (Mumbai Accident CCTV) होती की कार एका जागेवरुन उडून पुढपर्यंत फेकली गेली. या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची थरकाप उडवणारी दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
या अपघातमध्ये एकूण 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण चार वाहनांच्या झालेल्या या विचित्र अपघातामध्ये एकूण 5 जणांवर काळाने घाला घातलाय. तर जखमींपैकी काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
Maharashtra | 10 people got injured in a collision between four cars and an ambulance on Mumbai’s Bandra Worli Sea Link pic.twitter.com/7ihc7xnZv5
— ANI (@ANI) October 5, 2022
एक मारुती सुझुकीची बलिनो कार, सफेद रंगाची आणखी एक कार, रुग्णवाहिका, ह्युंदाई क्रेटा आणि अन्य एक वाहन या दुर्दैवी घटनेत अपघातग्रस्त झाले. सर्व वाहनांची अपघातानंतर झालेली स्थिती पाहून, हा अपघात किती भयंकर आणि जबर होता, याची कल्पना करता येऊ शकेल.
पाहा व्हिडीओ :
CCTV – 5 people died in the #accident that took place between four cars and an ambulance on #Mumbai‘s Bandra #Worli Sea Link in the early morning hours today.#Maharashtra #India #CCTV#SeaLink #SeaLinkAccident #BandraWorliSeaLink pic.twitter.com/efnDUq6DEp
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) October 5, 2022
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा थरारक घटनाक्रम कैद झालाय. 2.53 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. वांद्रे वरळी सी लिंकवर दोन वाहनांचा आधीच अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उभी असल्याचं दिसून आलंय. त्या रुग्णवाहिकेमागे अन्य दोन वाहनंही उभी होती. तर पुढे आणखी एक कार होती.
इतक्यात एक कार भरधाव वेगाने येते. वांद्रे वरळी सी लिंकवर अपघातग्रस्त वाहनांच्या लेनमध्येच ही कार थेट घुसते आणि जोरात आदळते. ही धडक इतकी भीषण होती की चारही वाहनं एकमेकांमध्ये घुसली. एका अपघातातून वाचलेल्या रुग्णांना मृत्यूने पुन्हा एकदा गाठल्याची दुर्दैवी घटना दसऱ्याच्या दिवशी पहाटे घडली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर तातडीने अपघातातील जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. पण त्यातील 5 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. पंतप्रधान कार्यालयाकडूनही या भीषण अपघाताबाबत दुःख व्यक्त करण्यात आलंय.