Dhule: भगतसिंह कोश्यारींनी ज्याचा सत्कार केला, तो निघाला झोलर! LIC King राजेंद्र बंबचा पर्दाफाश

LIC King Rajendra Bamb : आतापर्यंत पोलिसांनी जवळपास वीस कोटी रुपयांची राजेंद्र बंब यांची संपत्ती जप्त केलीय.

Dhule: भगतसिंह कोश्यारींनी ज्याचा सत्कार केला, तो निघाला झोलर! LIC King राजेंद्र बंबचा पर्दाफाश
राजेंद्र बंब यांचं धाबं दणाणलंImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 9:35 AM

धुळे : एक एलआयसी एजंट (LIC Agent) कोट्यवधींची मालमत्ता जमा करु शकतो का? एलआयसीच्या जोरावर एवढी मालमत्ता जमवणं खरंत शक्य आहे का? असा प्रश्न धुळ्यातील एलआयसी किंगवर करण्यात आलेल्या कारवाईतून उपस्थित केला जातोय. धुळ्यातील प्रसिद्ध एलआयसी किंग राजेंद्र बंब (Rajendra Bamb) यांच्यावर कारवाई करण्यात आली. 2 जूनला धुळ्यात मोठी कारवाई करण्यात आली. ज्याच्या घरावर कारवाई करण्यात आली, त्याचं नाव राजेंद्र बंब! अवैध सावकारी राजेंद्र बंब करत होते, अशी माहिती आता उघड झाली आहे. त्याच्याविरोधात धुळ्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस यंत्रणा कामाला लागली. आतापर्यंत डोळे पांढरे करतील, एवढा ऐवज आणि संपत्ती राजेंद्र बंब यांनी जमा केल्याचं तपासातून समोर आलंय. मंगळवारी सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोठं घबाड पोलिसांच्या (Dhule Crime) हाती लागलंय. क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. नवल म्हणजे अटक करण्यात आलेल्या या राजेंद्र बंब यांचा भगतसिंह कोश्यारी यांनी चक्क सत्कार केला होता. कोरोना काळात राजेंद्र बंब यांनी केलेल्या कामनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

राजेंद्र बंब कोण आहे?

राजेंद्र बंब एलआयसी एजंट आहे. अख्ख्या धुळे जिल्ह्यात त्यांची ओळख एलआयसी किंग म्हणून आहे. राजेंद्र बंब हे लोकांना व्याजाने कर्ज द्यायचे. लोकांना कर्ज देताना त्यांच्या घराचे मूळ कागद स्वतःकडे ते ठेवायचे आणि त्यांची आर्थिक पिळवणूक करायची, असा प्रकार राजेंद्र बंब करत असल्याचा आरोप करण्यत आलाय. सामान्य लोकं भीतीपोटी त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे आल्या नव्हत्या, असंही सांगितलं जातं. चकीत करणारी बाब म्हणजे राजेंद्र बंब यांचा एकदा तर थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना सत्कार केला होता. पोलिसांना कोरोना काळात सहकार्य केल्याबद्दल सत्कार केला होता.

चौथ्यांदा केलेल्या कारवाईत काय समोर?

मंगळवारी राजेंद्र बंब यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलिसांच्या हाती मोठा ऐवज लागला. यात सौदा केलेल्या 210 पावत्या, चार ते पाच विदेश चलक, 2.47 कोटींची कॅश, 34 सोन्याची नाणी, दोन ते अडीच कोटी रुपये किंमत्चाय 2,400 एफडी पावत्या, असा तब्बल 4.5 कोटी रुपयांचा ऐवज पोलिसांना सापडलाय.

हे सुद्धा वाचा
Rajendra Bamb

मोठी कारवाई

आतापर्यंत पोलिसांनी जवळपास वीस कोटी रुपयांची राजेंद्र बंब यांची संपत्ती जप्त केलीय. या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे. तसंच इतरही ठिकाणी राजेंद्र बंब यांचा मुद्देमाल असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. पोलीस त्या अनुशंगानेही तपास करत आहेत.

शुक्रवारी देखील राजेंद्र बंब यांच्या मालमत्तेची तपासणी करण्यात आली होती. 3 जून रोजी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 10.72 कोटी रुपयांचं घबाड राजेंद्र बंब यांच्याकडे असल्याचं समोर आलं होतं. यातही विदेशी चलनांचा साठा पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र बंब यांचे बँक लॉकर तपासले. सहापैकी पाच बँक लॉकरमध्ये कोट्यवधींची कॅश पोलिसांनी सापडली. यानंतर एकच खळबळ उडाली होती. गेल्या चार दिवसांपासून जप्त करण्यात आलेली संपत्ती मोजण्याचं काम सुरु होतं

प्रकरण उघडकीस कसं आलं?

राजेंद्र बंब यांच्याकडेच काम कऱणाऱ्या एका व्यक्तीनं पोलिसात तक्रार दिली होती. अवैध सावकारी विरोधात देण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. यानंतर राजेंद्र बंब यांच्या घरावर छापेमारी केली. यात कोट्यवधींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर राजेंद्र बंब यांना अटकही करण्यात आली. सुरुवातीला दोन दिवसांत राजेंद्र बंब यांच्या घरात करण्यात आलेल्या छापेमारीत पाच कोटी कॅश सापडली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी केलेल्या चौकशीतून 5.13 लाख रोकड सापडली होती. यावेळी दहा किलो सोनंहीही आढळलं होतं. या सोन्याची किंमतच तब्बल साडेपाच कोटी रुपये इतकी होती. सोबत सात किलो चांदीही यावेळी आढळली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात सोन्याची बिस्कीटचं सापडली होती.

सत्कार सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ, प्रेसनोट हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोशल मीडियावरुन किंवा वेबसाईटवरुन शेअर केले जातात. पण स्प्राऊटन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार राजेंद्र बंब यांच्या करण्यात आलेल्या सत्काराबाबतची सगळी माहिती या कारवाईनंतर लगेचच डिलीट करण्यात आली असल्यचा दावा करण्यात आलाय. उन्मेश गुजराथी यांनी याबाबतचं वृत्त दिलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.