Molestation Case : प्रत्येक स्पर्श वाईट नसतो; विनयभंगाच्या गुन्ह्यात क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका
बोरिवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने हा निकाल दिला आहे. तक्रारदार मुलगी ही 7 वीच्या वर्गातील विद्यार्थिनी आहे. न्यायालयाने तिचा जबाब विचारात घेण्यास नकार दिला. त्यात तिने 41 वर्षीय शारीरिक प्रशिक्षण (क्रीडा) शिक्षकाने अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा दावा केला होता. न्यायालयाने तिच्या या दाव्याची दखल घेताना विनयभंगाच्या गुन्ह्यात होणारा प्रत्येक स्पर्श हा काही असभ्य मानला जाऊ शकत नसल्याचे नमूद केले.
मुंबई : महिलांबरोबरच शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलींसाठी शाळाही असुरक्षित ठिकाण बनले आहे. अशाच एका शाळेच्या परिसरात घडलेल्या विनयभंगा (Molestation)च्या घटनेत मुंबईतील न्यायालया (Mumbai Court)ने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. प्रत्येक स्पर्श हा काही वाईट हेतूने म्हणजेच असभ्य भावनेने प्रेरित नसतो, असे महत्त्वपूर्ण मत नोंदवत कनिष्ठ न्यायालयाने शाळकरी मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका केली आहे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यात केसाइतकाच फरक आहे. त्यामुळे केवळ स्पर्श केल्याच्या आरोपावरून कुणा आरोपीविरुध्दचा विनयभंगाचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने हा निकाल देताना स्पष्ट केले आहे. (Borivali Metropolitan Magistrate acquits sports teacher of molestation case)
पिडीत मुलीचा जबाब विचारात घेण्यास कोर्टाचा नकार
बोरिवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने हा निकाल दिला आहे. तक्रारदार मुलगी ही 7 वीच्या वर्गातील विद्यार्थिनी आहे. न्यायालयाने तिचा जबाब विचारात घेण्यास नकार दिला. त्यात तिने 41 वर्षीय शारीरिक प्रशिक्षण (क्रीडा) शिक्षकाने अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा दावा केला होता. न्यायालयाने तिच्या या दाव्याची दखल घेताना विनयभंगाच्या गुन्ह्यात होणारा प्रत्येक स्पर्श हा काही असभ्य मानला जाऊ शकत नसल्याचे नमूद केले. प्रत्येक स्पर्श हा असभ्य भावनेने केलेला हल्ला किंवा स्त्रीच्या विनयभंगाचे कृत्य मानले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी शिक्षकाची विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यात केसाइतकाच फरक
या प्रकरणात उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण मते नोंदवली. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ए. आर. माळवदे म्हणाले, चांगला स्पर्श आणि वाईट (असभ्य भावनेने प्रेरित) स्पर्श यामध्ये केसाइतकाच फरक आहे. जोपर्यंत आरोपीने पीडितेला अनुचित स्पर्श केल्याचे ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केले जात नाहीत, तोपर्यंत स्पर्शाला असभ्य भावनेने केलेला हल्ला म्हणता येणार नाही किंवा तक्रारदार मुलगी वा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान झाला, असे म्हटले जाऊ शकत नाही.
क्रीडा शिक्षकाने संगणक कक्षात विनयभंग केल्याचा आरोप
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, ही घटना 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 8 जानेवारी 2010 रोजी घडली होती. त्यावेळी तक्रारदार मुलगी 7 वी इयत्तेत शिकत होती. तिने आरोप केला की पीटी शिक्षकाने तिला संगणक कक्षात बोलावले. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. शिक्षकाने त्याचा गैरफायदा घेत कथितरित्या अयोग्यरित्या स्पर्श केला. तिने पुढे दावा केला की तीच घटना तिच्यासोबत आणखी एकदा घडली होती, परंतु तिने भीतीपोटी त्या घटनेबाबत कुणालाही सांगितले नव्हते. मात्र, तिने 8 जानेवारीची घटना शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितली. त्यानंतर या प्रकरणात पोलिस तक्रार करण्यात आली होती. खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीच्या वतीने वकील सुबोध पाठक यांनी युक्तिवाद केला. घटना घडली तेव्हा एफआयआर नोंदवण्यास विलंब झाला होता. घटनेनंतर महिनाभराने, 25 फेब्रुवारी 2010 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती, असे पाठक यांनी न्यायालयाला सांगितले.
आरोपी शिक्षकाची शाळा व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार
आरोपी पीटी शिक्षकाने शाळा व्यवस्थापनाविरुद्ध शाळा न्यायाधिकरणात गुन्हा दाखल केला आहे. शाळेचे मैदान भाड्याने द्यायचे आणि लग्नसमारंभासाठी द्यायचे म्हणून आरोपी शिक्षकाचा शाळा व्यवस्थापनाशी वाद झाला होता. तसेच आरोपी शिक्षक सज्जन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनीही त्याला पाठिंबा दिला होता. तर तक्रारदार मुलीचे काका नगरसेवक असून मुख्याध्यापक त्यांच्याकडे नियमित येत असत. या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्याची दखल घेत न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की आरोपी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात 5 फेब्रुवारी 2010 रोजी वाद झाला होता, तर सध्याच्या प्रकरणातील एफआयआर 25 फेब्रुवारी 2010 रोजी दाखल करण्यात आला होता. यावरुन आरोपीने युक्तिवाद केल्यानुसार त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला गेला असावा, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि आरोपी शिक्षकाची विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली. (Borivali Metropolitan Magistrate acquits sports teacher of molestation case)
इतर बातम्या
Nashik Crime : नाशिकमधील देवळा जळीतकांड प्रकरण, पाचही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी