Live in Relationship : दिल्लीनंतर मुंबईत लिव्ह इन रिलेशनशीपचा करुण अंत, 25 वर्ष सोबत राहिले पण…

महेश पुजारी आणि पीडित महिलेचे प्रेमसंबंध होते. दोघेही गेली 25 वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र हल्ली त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच वादातून महिलेला हे रिलेशन तोडायचे होते.

Live in Relationship : दिल्लीनंतर मुंबईत लिव्ह इन रिलेशनशीपचा करुण अंत, 25 वर्ष सोबत राहिले पण...
प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराने प्रेयसीला संपवले
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 5:46 PM

मुंबई : श्रद्धा मर्डर केस, कंझावाला प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत लिव्ह इन रिलेशनशीपचे भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. 25 वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर 62 वर्षीय प्रियकराने 54 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गिरगाव परिसरात घडली आहे. महेश पुजारी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

25 वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते

महेश पुजारी आणि पीडित महिलेचे प्रेमसंबंध होते. दोघेही गेली 25 वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र हल्ली त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच वादातून महिलेला हे रिलेशन तोडायचे होते.

महिला प्रियकरावर घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकत होती

यासाठी पीडित महिला आपला प्रियकर महेशवर घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकत होती. यामुळे काही दिवसापासून महेश बाहेर राहत होता. याच कारणातून महेशने महिलेवर अॅसिड फेकले. यात महिला 50 टक्के भाजली होती.

हे सुद्धा वाचा

जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र 15 दिवसांपासून उपचार सुरु असलेल्या महिलेची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

हल्ला केल्यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.